गुरूवार, जून 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या दोघांमध्ये बरंच काही सुरु होतं आणि…”, भारती व हर्षला लग्नापूर्वी श्वेता तिवारीने थिएटरमध्ये पकडलं अन्…; मजेशीर किस्सा समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 25, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
bharti singh harsh limbachiyaa lovestory

“त्या दोघांमध्ये बरंच काही सुरु होतं आणि...”, भारती व हर्षला लग्नापूर्वी श्वेता तिवारीने थिएटरमध्ये पकडलं अन्...; मजेशीर किस्सा समोर

टेलिव्हीजन विश्वातील सगळ्यांचं आवडतं आणि लाडकं कपल म्हणजे भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया. भारती व हर्षचे हजारो चाहते आहेत. त्यांचं नातं आणि सुरु असलेला संसार खरंच कमालीचा आहे. कित्येक चाहती मंडळी भेटून या कपलचं कौतुक करतात. खरं तर सेटवर झालेली दोघांची ओळख लग्नापर्यंत कधी पोहोचली हे भारती व हर्ष यांनाही कळालं नाही. कॉमेडी सर्कस हा शो एकत्र करत असताना दोघांमध्ये मैत्री झाली. हर्ष कॉमेडी स्किट लिहायचा आणि ते इतर स्पर्धक मंचावर सादर करायचे. भारती व हर्ष एकमेकांना डेट करत असल्याची कल्पना कोणालाच नव्हती. मात्र पहिल्यांदाच या दोघांच्या नात्याबाबत अभिनेत्री श्वेता तिवारीला कळालं. तिने याबाबत आता खुलासा केला आहे. (bharti singh harsh limbachiyaa lovestory)

श्वेताने भारती व हर्षच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी श्वेताने तिचं करिअर, मुलगी, इंडस्ट्री अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान तिने भारती व हर्षचाही किस्सा सांगितला. भारती व हर्ष एकमेकांना डेट करत आहेत हे पहिल्यांदा श्वेतालाच कळालं. याविषयीच तिने पॉडकास्टमध्ये सांगितलं. भारती व हर्ष एकमेकांना डेट करत असताना चित्रपट पाहायला गेले होते. तिथे श्वेताही होती.

आणखी वाचा – “मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का?”, केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, म्हणाली, “तुमची असुरक्षितता…”

श्वेता म्हणाली, “मी मित्र मंडळींबरोबर जिस्म २ चित्रपट पाहायला गेले होते. थिएटर बऱ्यापैकी रिकामंच होतं. मी माझ्या मित्र मंडळींबरोबर अगदी उंचीवर असलेल्या रांगेत बसले होते. पण एका कोपऱ्यात फक्त दोघंच बसून चित्रपट बघत होते. त्या दोघांमध्ये बरंच काय काय सुरु होतं. अचानक माझी नजर भारतीकडे गेली. ही भारती सिंह आहे का? असं मी माझ्या मित्रांनाही विचारलं”.

आणखी वाचा – घोडबंदर रोडची वाईट अवस्था, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रवास करताना भडकली, रात्रीचं शूट करुन दोन तासाने घरी पोहोचली अन्…

“पण माझे मित्र मलाच ओरडले. असं तिच्याकडे बघून काही करु नको. ते कसंतरीच वाटतं. असं मित्रांनी मला सांगितलं. मी हाच विचार करत होते की, भारतीबरोबर हा मुलगा कोण आहे?. दुसऱ्या दिवशी कॉमेडी सर्कसच्या सेटवर मी पोहोचले तेव्हा भारतीला विचारलं की, भारती तू काल जिस्म २ पाहायला गेली होती का?. तेव्हा ती मला म्हणाली, हो मला चित्रपट पाहण्याचं मन होतं. हर्षबरोबर तू चित्रपट बघत होती हेही मी भारतीला बोलले. मला तिने हे कोणालाच सांगू नकोस असं म्हटलं”. भारती व हर्षलाही त्यांचे जुने दिवस आठवले.

Tags: Bharti Singhbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

ghabadkund movie
Entertainment

थरार आणि रहस्याचा नवा अनुभव; ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, कलाकारांचा दमदार अभिनय

जून 3, 2026 | 4:00 pm
 richa chadha on japan issue
Entertainment

“भिकारीपणा करु नका”, भारतीय महिलेने जपानमध्ये चोरी करताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “गर्दीत…”

जून 3, 2026 | 1:43 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Next Post
New FIR Against Yash Dayal

IPL च्या खेळाडूकडून १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसऱ्यांदा FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.