‘बिग बॉस’ सीझन १७ मधून सर्वांच्या समोर आलेली स्पर्धक आयेशा खान ही सध्या सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे.तिने अनेक समस्यांचा सामना केल्याचे देखील ती सांगते. आता नुकतीच आयेशाने कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. तिला देखील कास्टिंग काऊचचा सामना करवा लागल्याचे तिने सांगितले आहे. मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी तिने अनेकदा वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचेही सांगितले. पण मनोरंजन क्षेत्राव्यतिरिक्त बाहेर देखील तिच्यावर चुकीच्या टिप्पणी झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे. (aayesha khan on casting couch)
आयेशाने नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी एक कंपनी जॉइन केली होती. हा माझा पहिला अनुभव होता. फोटोशूट करायचे होते. त्यामुळे त्यांनी तीन-चार कपडे दिले. त्यामध्ये एक काळ्या रंगाचा नेट टॉप होता. तो घालून फोटो शूट करायचे होते. मला वाटलं की हा आतमध्ये घालायचा असेल पण त्यांनी यासाठी नकार दिला. ते म्हणाले आम्ही फोटो इतकेच घेऊ. तसेच अनेक बड्या कलाकारांची नाव घेऊन मनवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी सांगितले की आम्ही केवळ तुमच्या चेहऱ्याचाच फोटो घेऊ”.
तसेच दुसरा प्रसंग सांगताना ती म्हणाली की, “मी एकदा रिक्षाने प्रवास करत होते. मी वन पीस घातला होता. तेव्हा ऑटो ड्रायव्हरने सांगितले की कोणीतरी रिक्षाचा पाठलाग करत आहे. मला वाटल मी सोशल मीडियामुळे प्रसिद्ध आहे त्यामुळे कोणीतरी चाहता असेल. पण ती पाठलाग करणारी व्यक्ती जवळ आली आणि मला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी खूप घाबरले होते”.
तसेच अजून एक प्रसंग सांगताना ती म्हणाली की, “मी मालाडमध्ये राहत होते तेव्हा शेव पुरी खाण्यासाठी तिथे गेले. मी परत येत असताना एक काका भेटले. ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील. ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले तुझे स्तन खूप चांगले आहेत. त्यांच्या या बोलण्याने मी अधिकच घाबरले आणि तिथून पळून गेले”.
हे सर्व प्रसंग सांगताना आयेशा खूप अस्वस्थ झाली होती. तिच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती एक अभिनेत्री, मॉडेल व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. ती आता ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनमध्ये दिसून आली होती.