शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शुभविवाह’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “गेले चार आठवडे रात्रीची झोप उडाली…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 10, 2026 | 10:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kunjika Kalwint Welcomes Baby Boy:

'शुभविवाह' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Kunjika Kalwint Welcomes Baby Boy: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभ विवाह’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळतात. अशातच यातील एक अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे. ‘शुभविवाह’ या मालिकेत ‘पूर्णिमाची’ भूमिका साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट हिला खरंतर महिन्याभरापूर्वीच पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. मात्र तिने ही आनंदाची बातमी बाळाच्या जन्माला एक महिना पूर्ण झाल्यावर शेअर केली आहे.

आणखी वाचा: ठाणे-घोडबंदर रोडवर भीषण अपघात; या दुर्घटनेवर मराठी अभिनेत्री संतापली; म्हणाली, “सरकारने हात झटकू नये…”

सोशल मीडियावर तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात कुंजिका आणि तिच्या पतीने आपल्या बाळाचा चिमुकला हात हातात घेतलेला एक सुरेख फोटो पोस्ट केला आहे. करत कुंजिकाने लिहिलं, “अगदी एक महिन्यापूर्वी, जेव्हा आम्ही आमच्या सुंदर बाळाचे जगात स्वागत केले. गेले चार आठवडे रात्रीची झोप उडाली असली, तरी मुलाची ती मिठी आणि त्याच्याबद्दलचं प्रेम जगातील इतर कोणत्याही सुखापेक्षा मोठं आहे. पालकत्व हे जादूई आणि तितकंच आव्हानात्मक आहे. आम्ही शिकत आहोत, पुढे जात आहोत आणि आमच्या मुलाच्या आणखीन प्रेमात पडत आहोत. या नवीन अध्यायाबद्दल आणि आमच्या वाढत्या कुटुंबाभोवती असलेल्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत.” असं लिहीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Kunjika Kalwint Welcomes Baby Boy)

View this post on Instagram

A post shared by Kunjika 💫 (@kunjika_k_official)

काही महिन्यांपूर्वीच कुंजिकाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पार पडला होता. तर या पोस्टनंतर मराठी कलाविश्वातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच कतरिना आणि विकी कौशल यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘विहान’ असं ठेवलं. कतरिनाने देखील आपल्या बाळाचा छोटासा हात हातात घेतलेला फोटो शेअर केला होता. कुंजिकाने देखील अशाच प्रकारे आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. (Kunjika Kalwint Welcomes Baby Boy)

आणखी वाचा: “आई तुझी खूप आठवण…” आईच्या निधनानंतर ‘पारू’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाला, “हसऱ्या चेहऱ्याने जगणारी”

Tags: goodnewskunjika kalwintKunjika Kalwint Welcomes Baby Boymarathi actressshubhvivah
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Prashant Loke Apology Post

"लिहिलं होतं तमाशा करू नको" शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी; म्हणाले, "माझी चूक झाली"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.