सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लिहिलं होतं तमाशा करू नको” शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी; म्हणाले, “माझी चूक झाली”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 10, 2026 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prashant Loke Apology Post

शशांक केतकरवर टीका करणाऱ्या लेखकाने मागितली माफी

Prashant Loke Apology Post : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अभिनेता शशांक केतकर आणि दिग्दर्शक-निर्माता मंदार देवस्थळी यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्यांवर कलाकारांचे मानधन थकवल्याचे आरोप अनेक वर्षांपासून होत असून, यावर शशांक केतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चॅट्सद्वारे आपली भूमिका मांडली आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. शशांकच्या या पोस्टनंतर त्याच मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री माधवी जुवेकर यांचे पती आणि लेखक प्रशांत लोके यांनी प्रतिक्रिया देत शशांकने असा “तमाशा करू नये” असं मत व्यक्त केलं होतं आणि मंदार देवस्थळी यांच्या बाजूने पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्यानंतर प्रशांत लोके यांनी पुन्हा एकदा पोस्ट करत शशांक केतकर यांची जाहीर माफी मागितली आहे.

प्रशांत लोके यांची पोस्ट :
“नमस्कार मी प्रशांत लोके, मी लेखक आहे. चार दिवसांपूर्वी माझ्याकडून एक चूक झाली.”शशांक केतकर” या नटाचे त्याच्या मालिकेचा निर्माता मंदार देवस्थळी याच्याकडे पाच लाख बाकी आहेत. माझ्या बायकोचेही साडेतीन लाख बाकी आहेत. शशांकने ती पोस्ट टाकली तेव्हा, मी लिहिलं होतं तमाशा करू नको. तर मी आधी शशांकची माफी मागतो, मला एक म्हणायचं आहे. की शक्यतो सर्व निर्माते कलाकारांचे टेक्निशियनचे पैसे देतात. आणि त्यांनी ते द्यावे. कारण माझ्या माहितीनुसार चॅनल त्यांना सर्व पैसे देतो. मग त्यांनी कलाकारांचे पैसे द्यावेच. नाहीतर निर्मितीच्या क्षेत्रात येऊ नये. मी आताही सांगतो, मंदारने त्या पैशांचं काय केलं माहित नाही. त्याला पुन्हा निर्माता करावा की नाही हा चॅनलचा प्रश्न आहे. (Prashant Loke Apology Post)

आणखी वाचा – ‘शुभविवाह’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “गेले चार आठवडे रात्रीची झोप उडाली…”

पण सगळ्यांचे पैसे हक्काने देणाऱ्या निर्मात्यांवर मी बोलून अन्याय केला. लोक मला म्हणाले, “तुझ्या बायकोला नोकरी आहे. तिला काही फरक पडत नाही”. तर फरक पडतो. पहाटे उशिरापर्यंत शूटिंग करून ती शार्प नऊला ऑफिसमध्ये पोहोचते, कष्टाचे पैसे सगळ्यांना मिळावेत. पैसे न देणाऱ्या निर्मात्याला चॅनलने मालिका देऊ नये. ‘मंदार देवस्थळी’ आधी तुम्ही रेग्यूलर पैसे द्यायचात. नाहीतर आपण पैसे नाही दिले तर कलाकारांचं काही बिघडत नाही असा पायंडा पडेल. हे कुठल्याही कलाकारासाठी आणि टेक्निशियनसाठी चांगलं नाही, हे तुम्ही जाणून असालच, तुम्ही पैसे न दिल्यामुळे लोकांचे खूप प्रॉब्लेम झाले. पण हे योग्य नाही. शशांकशी माझं काही शत्रुत्व नाही. त्याला वाईट वाटलं असेलच, मी त्याची माफी मागतो. कारण माझ्यावर घरच्यांनी केलेले संस्कार आणि पैसे बुडाल्याचं दुःख मला माहित आहे. पण कुठल्याही निर्मात्याने, टेक्निशियनचे पैसे बुडवणं खरंच चुकीचं आहे. पोस्ट करायची मला घाई असते. आणि ती कधीतरी अंगाशी येते. तरी बरं मला माफी मागायची लाज वाटत नाही. चुकलं तर मी माफी मागतोच”. (Prashant Loke Apology Post)

आणखी वाचा – ठाणे-घोडबंदर रोडवर भीषण अपघात; या दुर्घटनेवर मराठी अभिनेत्री संतापली; म्हणाली, “सरकारने हात झटकू नये…”

प्रशांत लोके यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असून, अनेकांनी कमेंट करत त्यांनी चूक मान्य करून जाहीर माफी मागितल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. “मनापासून माफी मागितली, तेच महत्त्वाचं” अशा प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिल्या आहेत. दरम्यान, शशांक केतकर यांनी केलेल्या आरोपांनंतर हा वाद नेमका कोणत्या वळणावर जाणार, याकडे संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाचं लक्ष लागलं आहे. (Prashant Loke Apology Post)

Tags: marathi entertainment newsmarathi malikashashank ketkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Marathi Actor Post On Thane-Ghodbundar Accident

“ते वळण पाहून छातीत धस्स झालं…” घोडबंदर अपघातात थोडक्यात वाचला मराठी अभिनेता; पोस्ट शेअर करत म्हणाला, "अपघातात तिथे पार चेंगरून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.