अभिनेता श्रेयस तळपदेने आजवर त्याच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठीसह बॉलीवूडमध्ये ही स्वतःच स्थान निर्माण करत श्रेयसने त्याचा चाहता वर्ग तयार केला. काही दिवसांपूर्वी श्रेयसबाबत धक्का देणारी बातमी समोर आली. हृदयविकाराचा झटका आल्याने श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच समोर आलं, त्यावेळी चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पसरलेलं पाहायला मिळालं. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. (Shreyas Talpade Video)
त्यावेळी त्याची पत्नी दीप्ती सोशल मीडियाद्वारे साऱ्या प्रेक्षकांना विनंती करत श्रेयससाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. त्यानंतर श्रेयस बरा झाला असल्याची पोस्ट त्याने स्वतःच त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर आता श्रेयस पुन्हा कॅमेरा समोर कधी येणार तो प्रेक्षकांसमोर केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते श्रेयसच्या येण्याकडे डोळे लावून बसलेलं असताना श्रेयसने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरुन स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे तो व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
श्रेयसने अगदी साध्या पद्धतीने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करण्यापूर्वी श्रेयस त्याच्या चाहत्यांना उद्देशून एक व्हिडीओ शेअर केला, त्यात तो म्हणाला, “परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करेन की, सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे. कारण, आपलं आरोग्य चांगलं नसेल तर, काय होतं हे मी स्वत: भोगलंय. जे माझ्याबरोबर झालं ते इतर कोणाबरोबरही होऊ नये. त्यामुळे, परमेश्वरा नेहमी सगळ्यांना चांगलं आरोग्य दे!” असं त्याने म्हटलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये श्रेयस पाराझींसह केक कापताना दिसत आहे. या व्हिडीओत पापाराझी श्रेयसला विचारत आहेत की, “सर, तुम्ही कसे आहात?”. यावर तो “मी बरा आहे” असं म्हणताना दिसत आहे. यानंतर श्रेयसने पापाराझींना स्वतःच विचारले की, “तुम्हाला मी कसा वाटतोय?”, यावर ते म्हणाले, “सर तुम्ही चांगले दिसत आहात”, हे ऐकून श्रेयस म्हणतो, “मला हेच ऐकायचे होते”. यानंतर तो पापाराझींसह केक कापतो.