गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये ‘या’ स्पर्धकांची एंट्री?; ‘चला हवा येऊ द्या’ मधील विनोदवीर ते लावणी नृत्यांगना, स्पर्धकांची यादी जवळपास निश्चित

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 6, 2026 | 12:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहाव्या पर्वाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. बिग बॉस मराठीचं सहावं पर्व कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर आता याबाबत माहिती समोर आली असून बिग बॉस मराठी ६ येत्या ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रितेश देशमुख यावेळीही सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. शो सुरू होण्यास अजून 6 दिवस बाकी असतानाच, घरात कोणते चेहरे पाहायला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर यंदाच्या पर्वात केवळ कलाकारच नव्हे, तर सोशल मीडिया विश्वातील लोकप्रिय चेहरे, लावणी नृत्यांगना आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले सेलिब्रिटीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता सागर कारंडे दिसण्याची शक्यता आहे. अभिनेत्री, नृत्यांगना दीपाली सय्यद, अनुश्री माने, अभिनेता संकेत पाठक, लावणी नृत्यांगना राधा मुंबईकर आणि अभिनेत्री रसिका जमसुतकर यांची नावं समोर आली आहेत. याशिवाय बिग बॉसच्या नव्या पर्वात कोणकोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Bigg Boss Marathi 6)

दरम्यान, बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण याने विजेतेपद पटकावले होते. गायक अभिजीत सावंत या स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. आता बिग बॉस मराठी 6 मध्ये कोण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आणि कोण खेळावर अधिराज्य गाजवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Bigg Boss Marathi 6)

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmententertainment newsritiesh deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Gayatri Datar Will Get Married Soon

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचं ठरलं! लवकरच अडकणार लग्नबंधनात, सुपारी फुटली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.