शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भर कार्यक्रमात शाहिद कपूर स्टेजवर कोसळला अन्…”, व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा, पाहा नेमकं काय घडलं

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 22, 2023 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shahid Kapoor Viral Video

"भर कार्यक्रमात शाहिद कपूर स्टेजवर कोसळला अन्…", व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा, पाहा नेमकं काय घडलं

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो डान्स करताना खाली पडताना दिसत आहे. गोव्यात सोमवारी ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या दिवशी माधुरी दीक्षितपासून शाहिद कपूरपर्यंत सर्वांनीच आपल्या नेत्रदीपक नृत्याने सर्वांची मनं जिंकली. यानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद स्टेजवर परफॉर्म करताना खाली पडला असल्याचं दिसत आहे. (Shahid Kapoor Viral Video)

ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली आहे, यांत शाहिद कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे आणि तो स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याच्यासह स्टेजवर त्याचा डान्स ग्रुपही परफॉर्म करत होता. डान्स करत असताना तो मागे वळताच अचानक खाली पडला. मात्र, शाहिदने लगेच स्वतःला सावरत उठून पुन्हा तेवढ्याच एनर्जीने डान्स केला.

आणखी वाचा – Video : “फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, अन्…”, जवादेंच्या घरी नव्या सूनबाईंचं जल्लोषात स्वागत, प्रसाद-अमृताच्या उखाण्यांनी वेधलं लक्ष

डान्स झाल्यानंतर शाहिदने तो जिथे पडला होता त्याजागी नेमका तो कसा पडला, याची त्याने तपासणी केली. त्याच्या या कृत्यावर त्याला स्वतःलाच हसू आलं. त्यानंतर परतताना त्याने त्याच्या चाहत्यांना फ्लाईंग किस दिली. दरम्यान उपस्थित मंडळींनी शाहिदला प्रोत्साहन दिलं आणि त्याचा डान्स एन्जॉय ही केला.

आणखी वाचा – चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायली संजीवची अनोखी शक्कल, नक्की काय केलं पाहा?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

शाहिदने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कबीर सिंग’ मधील प्रसिद्ध ‘वाना वाह वाह बीजीएम’ मध्ये बाइक चालवत कार्यक्रमात प्रवेश केला. ‘मौजा ही मौजा’ ते ‘धटिंग नाच’ या गाण्यांवर ठेका धरत उपस्थितांची मनं जिंकली. स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी शाहिदचा रेड कार्पेट लूक विशेष चर्चेत ठरला. आजवर शाहिदने त्याच्या अभिनयाने, नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याच्या गोव्यात सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवातील नृत्याचंही सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: bollywood actoriffiIffi Goashahid kapoorShahid Kapoor Viral Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sankarshan Karhade Post

"माझे डोळे सतत भरून येत होते…", नाटकाच्या प्रयोगानंतरचा दैवी अनुभव शेअर करत संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, "मला पहिल्यांदा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.