सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता, शोएब इब्राहिमने सांगितली अवस्था, म्हणाला, “ट्युमर खूपच घातक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 5, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dipika kakar cancer

दीपिका कक्करला पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता, शोएब इब्राहिमने सांगितली अवस्था, म्हणाला, “ट्युमर खूपच घातक...”

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमसाठी गेले काही दिवस अगदी कठीण होते. गेल्याच महिन्यात दीपिकासाठी शारिरीकदृष्ट्या सगळं काही आव्हानात्मक होतं. सुरुवातीला फक्त तिच्या पोटात दुखत होतं. मात्र काही तपासणी झाल्यानंतर दीपिकाला कर्करोग झाला असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. तिच्या लिव्हरमध्ये ट्युमर होता. दरम्यान सहा तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये ट्युमर काढण्यात आला. तसेच लिव्हरचा काही भागही काढण्यात आला असल्याचं शोएबने सांगितलं होतं. रुग्णालयातून घरी आल्यानंतर दीपिका स्वतःची काळजी घेत आहे. पण आता नक्की तिची अवस्था कशी आहे?, पुन्हा कर्करोग होण्याची शक्यता आहे का? याबाबत शोएब व दीपिकाने व्लॉगद्वारे सांगितलं आहे. (dipika kakar cancer)

शोएब व दीपिकाने युट्युबद्वारे एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये शोएबने म्हटलं की, “आम्ही सर्जरीचा दिवस विसरुच शकत नाही. मी ती तारीखही विसरु शकत नाही. मी एका खिडकीजवळ बसलो होतो. खूप विचारांमध्ये अडकलो होतो. माझे काही मित्रही होते जे मला सतत पाठिंबा देत होते. डॉक्टर नक्की काय सांगत आहेत? याची आम्ही वाट बघत होतो. आता या गोष्टीला एक महिना झाला आहे”.

आणखी वाचा – “जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं”, राज ठाकरेंच्या वक्तव्याची चर्चा, थेट सरकारला सवाल, म्हणाले…

पुढे तो म्हणाला, “सर्जरीनंतर दीपिकाचं शरीर तिला उत्तम साथ देत आहे. ती आता चालू शकते, ट्रेडमिलवरही व्यायाम करु शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ती जड वस्तू उचलू शकत नाही किंवा योगही करु शकत नाही. कारण त्यामुळे शरीर खेचलं जाण्याची शक्यता असते. तिसऱ्या स्टेजचा ट्युमर दीपिकाच्या लिव्हरमध्ये होता. डॉक्टरांनाही इतकं मोठं असेल असं वाटलं नव्हतं. कॅन्सरचा काही भाग पुन्हा शरीरात असू शकतो अशी शक्यता होती. मात्र तसं काहीच नाही. तरीही डॉक्टरांनी आम्हाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आम्हीही खूर काळजी घेत आहोत”.

आणखी वाचा – “हा कोणता माज?”, मराठी भाषा न बोलणाऱ्यांविरोधात अक्षय केळकरचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाला, “किमान कर्मभूमीबद्दल…”

“दीपिकाला जो कॅन्सर झाला त्यामध्ये हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. पुन्हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. लिव्हरसाठी किमो काम करत नाही. त्यासाठी टार्गेट थेरपी आणि औषधं घ्यावी लागतात. प्रत्येक २१ दिवसांनी रुग्णालयामध्ये जावं लागतं. पण सध्या डॉक्टरांनी आम्हाला औषधांद्वारेच उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. पण पुढे काही समस्या उद्भवली तर IV द्वारे उपचार घ्यावे लागतील. महत्त्वाचं म्हणजे या ट्रिटमेंटचे शरीरावरही परिणाम होतात. तोंडात अल्सर होणं, हाता-पायाला जखम झाल्यासारखं दिसणं, उलटी, जुलाब असा त्रास होतो. आता खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येक तीन महिन्यांनी स्कॅन करावं लागणार आहे”.

Tags: bollywood newsdipika kakarentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Disha Vakani New Pic

"कलाकाराचे आयुष्य खराब", दयाबेनची वाईट अवस्था, याला जबाबदार पतीच?, फोटो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, म्हणाले, "चेहरा, केस…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.