स्वत:चं घर असणे हे प्रत्येकाच्या बकेट लिस्टमधील एक इच्छा असते आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपपल्या परीने मेहनत घेत असतो. अशातच गेल्या काही महिन्यांत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक् कलाकारांनी त्यांचं नवीन घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली. प्रसाद ओक, अश्विनी कासार, माधुरी पवार, पृथ्वीक प्रताप यांसह अनेक कलाकारांनी घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं. यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील अश्विनी महांगडे.
अश्विनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या नवीन घराबद्दलही माहिती दिली आहे. अश्विनीची जवळची मैत्रीण माधुरी पोळने हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला अभिनेत्रीच्या नव्या घरातला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अश्विनीच्या घराची पहिली झलक पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोमध्ये अश्विनीच्या नवीन घराचा व्ह्यू तसेच तिच्या हातात घराची किल्लीसुद्धा पाहायला मिळत आहेत.
तसेच अश्विनीने नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळेद्वारे तिने तिच्या स्वप्नपूर्तीची खास पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने तिचा एक खास फोटो पोस्ट करत खाली “प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. मग काय… स्वप्नं पूर्ण होतातच. आज एक स्वप्न पूर्ण झालं.” असं कॅप्शन दिलं आहे आणि या कॅप्शन पुढे तिने किल्लीची एक इमोजीदेखील पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “लग्नाला इतकी वर्ष झाली पण…”, बायकोबरोबरचा फोटो शेअर करत कुशल बद्रिकेची पोस्ट, म्हणाला, “वेळ यावी लागते…”
अश्विनीच्या नवीन घराच्या स्वप्नपूर्तीनिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अश्विनी सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तसेच आगामी काळात तिचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट येणार आहे. यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहेत.