मूळची दादरची, मुंबईतल्या ज्ञात भागात लहानाची मोठी झालेली अभिनेत्री शिवानी बावकर सर्वाचीच लाडकी आहे. आज शिवानीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आज आपण शिवानीचा अभिनय सृष्टीतील प्रवास जाणून घेणार आहोत. ‘लागीर झालं ही’ मालिका रसिकांना विशेष भावली होती. या मालिकेसाठी मुंबईत राहिलेल्या शिवानीला मात्र तिच्या अभिनयाची कारकीर्द ही साताऱ्यातून करणं जरा अवघडच होत. (shivani baokar birthday)
हो. शिवानीची शीतली ही गाजलेली भूमिका अल्पावधीतच लोकांनी डोक्यावर उचलून धरली. ‘लागीर झालं जी’ या मालिकेतू शीतली घराघरांत पोहोचली. या मालिकेच्या शूटिंग करिता काही वर्षांकरिता शिवानीला मुंबईहून साताऱ्यात जावं लागलं होत. खऱ्या अर्थाने तिचा हा अभिनय सृष्टीतील प्रवास शिवानीने शीतली या भूमिकेतून म्हणजेच ‘लागीर झालं जी’ पासून सुरु केला. आणि या मालिकेमुळे शिवानीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
पहा शिवानीचा अभिनय प्रवास – (shivani baokar birthday)
या मालिकेनंतर शिवानीने तिची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळविली. ‘उंडगा’, ‘युथटयूब’, ‘गुल्हर’, ‘नाते नव्याने’ या चित्रपटात शिवानीला पाहून रंजक ठरलं. मात्र मालिका, छोटा पडदा शिवानीला सतत खुणावत होता. त्यामुळे मध्यंतरी तिने ‘तुमच्या आमच्यातली कुसुम’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. आता शिवानी ‘लवंगी मिरची’ या मालिकेत अस्मि या भूमिकेत पाहायला मिळतेय.

बोलण्यात पटाईत, चतुर आणि समोरच्या व्यक्तीला चोख उत्तर देणारी अशी शीतलीची भूमिका साकारलेली शिवानी खऱ्या आयुष्यात मात्र अगदीच निरागस आहे. तिच्या अभिनयाच्या जादूने तिने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची ओळख शीतली म्हणून मिळवली. खऱ्या आयुष्यात शिवानी खूप हुशार आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्स्लेटर म्हणून एका आयटी कंपनीत काम केलं आहे. (shivani baokar birthday)
====
हे देखील वाचा – डबल रोल मात्र आवाज देणारी व्यक्ती एक, काय आहे मृणाल यांचा नेमका किस्सा
====
ऑनस्क्रीन दिसायला शिवानी ही सोज्वळ असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती खूपच स्टायलिश आहे. सोशल मीडियावरही शिवानी कमालीची सक्रिय असते. ती नेहमीच तिचे वेगवेगळे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. शिवानीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तिच्या तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घालत असते.
