सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहे की ते फक्त अभिनेते म्हणून नव्हे तर अनेक कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव यामध्ये प्रामुख्याने घेता येईल. संकर्षणच्या मनमोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत.सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. पण सध्या संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे प्रयोग देखील जोरदार प्रयोग सुरु आहेत.चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील या नाटकाचं कौतुक करत असतात. तर अश्यातच एका बॉलिवूड अभिनेत्याने देखील या नाटकाला हजेरी लावली असून त्याने कलाकारांचं कौतुक देखील केलं.(Sankarshan Karhade post viral)
संकर्षण अलिकडेच माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीरच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता.या सोबत तो नाटकांमध्येही काम करताना दिसून येतो.त्याचं ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सध्या बरंच गाजतंय. या नाटकादरम्याने अनेक किस्से घडत असतात. आणि हे किस्से तो अनेकदा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
====
हे देखील वाचा – “झूठा..” नवीन गाण्यातून राखीचा आदिल खानला टोला?
===
नुकतीच संकर्षणने या नाटकाविषयीचा एक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. सध्या या नाटकाला शर्मन जोशीने हजेरी लावली होती. शर्मनबरोबरचा फोटो शेअर करत संकर्षणने एक खास पोस्ट शेअर केली, ‘तू म्हणशील तसं’च्या कालच्या प्रयोगाला पहिल्या रांगेत अंधारात कुणीतरी ओळखीचा चेहरा दिसला.. मी पहिल्या प्रवेशाच्या Exit नंतर आतून डोकवून पाहिलं तर ; #bollywood मधला लाडका, फेमस अभिनेता शर्मन जोशी आला होता..??? पूर्ण प्रयोग त्यांनी मन लाउन पाहिला.. त्यांना नाटक खूssssप आवडलं .. खूप कौतुक पण केलं .. फार फार भारी वाटलं बघा .. स्टाईल , गोलमाल , ३ ईडियट्स सारख्या सिनेमांत पाहिलेला हा माणुस आपलं कौतुक करत होता.. मज्जा आली ?❤️ आणि काम तुम्ही कुठेही करा हो.. नाटकाशी जोडलेला माणुस नाटकाकडे येतोच. अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. तर त्याच्या या पोस्टवर देखील अनेकांनी संकर्षणला शुभेच्छा देत त्यांच्या नाटकाचं कौतुक देखील केलं.(Sankarshan Karhade post viral)
खरं तर शरमन जोशी हा देखील नाट्य अभिनेता आहे. त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला मराठी तसेच गुजराथी नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.