अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती अशा चौफेर भूमिका साकारत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सिनेविश्वात खंबीरपणे उभी आहे. सुशिक्षित, सुविचारी, सुजाण, सुसंस्कारित अभिनेत्री म्हणून मृणालच नाव अचूक आहे. मृणालच्या एका चित्रपटा दरम्यानचा किस्सा चंदेरी सोनेरी या पुस्तकात लेखिका ललिता ताम्हाणे यांनी शेअर केला तो वाचून अंगावर काटे आले. हजरजबाबी, वक्तशीर अशी मृणाल कायमच तिच्या अभिनयातून सिनेरसिकांच्या मनावर राज्य करते. तिच्या अभिनयाचं कौतुक सर्वच स्तरातून होताना नेहमी होताना दिसत.(mrinal kulakarni receives an award)
जोडीदार चित्रपटादरम्यानचा हा किस्सा आहे. जोडीदार चित्रपट पाहिला असेल तर आठवेल की या चित्रपटात मृणालने डबल रोल केला होता. आणि तेव्हा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात नायिकेचा डबल रोल असल्यामुळे मृणालकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी मृणालला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा स्क्रीन व्हिडीओकॉन पुरस्कारही मिळाला होता. मृणालच यांचं असं म्हणणं होत की, माझा डबल रोल असल्यामुळे, बक्षिस मिळवणं, ही माझी जबाबदारीच आहे, असं मला वाटत. त्यामुळेच हे बक्षिस मिळाल्यावर मला माझी जबाबदारी पार पाडल्याच समाधान लाभलं होत. एक बाहुली मिळण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
पहा मृणाल यांचं का झालं कौतुक – (mrinal kulakarni receives an award)
जोडीदार मधल्या डबलरोल साठी मृणाल यांनी दोन वेगवेगळे गेटअप केले होते. किती तरी लोकांनी जोडीदार बघितल्यावर मृणालला विचारलं होत, कि या दोन भूमिकांसाठी दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी डबिंग केलंय का? एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा अजून मोठी दाद काय असू शकते? त्यावेळी लेखिका ललिता ताम्हाणे यांना मृणाल म्हणाल्या होत्या – “लोकांनी असं विचारलं, तेव्हा मला खरंच, खूप समाधान लाभलं होत. माझ्या दृष्टीने तोच खरा बक्षिसांचा क्षण होता.”(mrinal kulakarni receives an award)
====
हे देखील वाचा – तब्बल १५ वर्ष अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेसने घातला होता बहिष्कार
====
मृणाल यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला उत्तम ठसा उमटविला आहे. नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक प्रतिभासंपन्न कलावंत म्हणून ओळखल्या जातात. इंटरनेटच्या जगतात पुस्तकांसोबत मैत्री ठेवणाऱ्या मृणाल अपवाद आहेत. ग्लॅमरच्या या मायावी जगात मृणाल यांच्या सारखी व्यक्ती मिळणं म्हणजे अतिशय दुर्मिळ.