शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “बाईकवरुन तिळगूळ वाटताना…”, आशूसाठी शिवाने घेतला हटके उखाणा, म्हणाली, “त्याला जो पण नडेल…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 11, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva took a special ukhana for Ashu Zee Marathi Makar Sankrant special program video viral on social media.

आशुसाठी शिवाने घेतला हटके उखाणा, व्हिडीओ व्हायरल

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. मालिकेत एकामागोमाग येणारी रंजक वळणे, अडथळे, संकटे यांमुळे मालिका पाहण्याची उत्सुकता वाढून राहिली आहे. मालिकेत शिवा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे. पूर्वाने आजवर मालिका, नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील तिची व आशुची जोडी सर्वांच्याक पसंतीस पडत आहे. त्यांच्या नात्यात सध्या अनेक चढ-उतार येत असले तरी त्यांनी एकत्र यावे अशी त्यांच्या चाहत्यांची व मालिकेच्या प्रेक्षकांची इच्छा आहे. अशातच आता शिवाने लाडक्या आशुसाठी खास उखाणा घेतला आहे. (shiva took special ukhana for ashu)

झी मराठीवर लवकरच ‘मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रम’ पार पडणार आहे. उद्या म्हणजेच १२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून सध्या या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओपैकी शिवाने आशुसाठी हटके उखाणा घेतल्याचा समोर आला आहे आणि हा व्हिडीओला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओत शिवाने आशुसाठी उखाणा घेताच लाखात एक आमचा दादा मालिकेतीळ अभिनेत्रींनी तिचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘धोबी घाट’च्या चित्रीकरणावेळी किरण रावने आमिर खानला दिलेला त्रास, स्वत: केलं भाष्य, म्हणाली, “त्याच्यावर ओरडले…”

या व्हिडीओमध्ये शिवा आशुसाठी असा उखाणा घेते की, “आशु हे तुझ्यासाठी… बाईकवरुन वाटताना तिळगूळ, लागला मला धक्का…; बाईकवरुन वाटताना तिळगूळ, लागला मला धक्का… आशुला जो नडेल, त्याच्या कपाळात बुक्का”. शिवाच्या या उखाण्यानंतर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमधील दादाच्या तिन्ही बहिणी तिचं कौतुक करतात. त्यांच्यासह शिवाच्या अनेक चाहत्यांनाही हा खास उखाणा आवडला आहे. तसं त्यांनी या व्हिडीओखालील प्रतिक्रियांमधून म्हटलं आहे.

आणखी वाचा – “लग्नाचं गिफ्ट म्हणून…”, अंकिता वालावलकरने नवीन गाडी घेताच डीपी दादांची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले, “मुंबईत फिरायला…”

“क्या बात है”, “खूपच छान”, “एक नंबर”, “शिवा ताई वा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी हा उखाणा आवडल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, शिवा मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आशूने घराबाहेर काढल्यानंतर शिवा तिच्या माहेरी परत आली आहे. त्यामुळे आता शिवा आशुच्या मनात आपलं प्रेमम मिळवण्यासाठी व त्याला झालेले गैरसमज दूर करण्यासाठीकजे प्रयत्न करत आहे.

Tags: shiva took special ukhana for ashushiva ukhana videoshiva zee marathi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
alia bhatt-ranbir kapoor security

आलिया-रणबीर यांच्या लग्नात शेजारी होते नाराज, सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोठा खुलासा, नेमकं काय झालं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.