‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेपैकी एक आहे. मालिकेत एकामागोमाग येणारी रंजक वळणे, अडथळे, संकटे यांमुळे मालिका पाहण्याची उत्सुकता वाढून राहिली आहे. मालिकेत शिवा ही भूमिका अभिनेत्री पूर्वा कौशिक साकारत आहे. पूर्वाने आजवर मालिका, नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेतील तिची व आशुची जोडी सर्वांच्याक पसंतीस पडत आहे. त्यांच्या नात्यात सध्या अनेक चढ-उतार येत असले तरी त्यांनी एकत्र यावे अशी त्यांच्या चाहत्यांची व मालिकेच्या प्रेक्षकांची इच्छा आहे. अशातच आता शिवाने लाडक्या आशुसाठी खास उखाणा घेतला आहे. (shiva took special ukhana for ashu)
झी मराठीवर लवकरच ‘मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रम’ पार पडणार आहे. उद्या म्हणजेच १२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार असून सध्या या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओपैकी शिवाने आशुसाठी हटके उखाणा घेतल्याचा समोर आला आहे आणि हा व्हिडीओला प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडीओत शिवाने आशुसाठी उखाणा घेताच लाखात एक आमचा दादा मालिकेतीळ अभिनेत्रींनी तिचं कौतुक केलं आहे.
या व्हिडीओमध्ये शिवा आशुसाठी असा उखाणा घेते की, “आशु हे तुझ्यासाठी… बाईकवरुन वाटताना तिळगूळ, लागला मला धक्का…; बाईकवरुन वाटताना तिळगूळ, लागला मला धक्का… आशुला जो नडेल, त्याच्या कपाळात बुक्का”. शिवाच्या या उखाण्यानंतर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेमधील दादाच्या तिन्ही बहिणी तिचं कौतुक करतात. त्यांच्यासह शिवाच्या अनेक चाहत्यांनाही हा खास उखाणा आवडला आहे. तसं त्यांनी या व्हिडीओखालील प्रतिक्रियांमधून म्हटलं आहे.
“क्या बात है”, “खूपच छान”, “एक नंबर”, “शिवा ताई वा” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी हा उखाणा आवडल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, शिवा मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आशूने घराबाहेर काढल्यानंतर शिवा तिच्या माहेरी परत आली आहे. त्यामुळे आता शिवा आशुच्या मनात आपलं प्रेमम मिळवण्यासाठी व त्याला झालेले गैरसमज दूर करण्यासाठीकजे प्रयत्न करत आहे.