Bigg Boss Marathi 5 मध्ये काही सदस्यांची मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले. धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे त्यापैकी एक आहेत. संपूर्ण सीझन ते एकमेकांबरोबर असल्याचे पाहायला मिळाले. ते एकमेकांना भाऊ-बहीण मानत असल्याचेही या शोमधून दिसून आले. या भाऊ-बहिणीची जोडी केवळ पडद्यावरच नाही चांगली नाही तर त्यांचा ऑफस्क्रीन बॉण्डही तितकाच खास आहे. सोशल मीडियाद्वारे या भाऊ-बहिणीच्या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अशातच आता अंकिताने नवीन गाडी घेतली आहे आणि या नवीन गाडीबद्दल डीपी दादांनी एक भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (dhananjay powar on ankita walawalkar new car)
अंकिताने एक आलिशान गाडी खरेदी केली असून या नवीन गाडीबरोबर चे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. होणारा नवरा कुणाल भगतचा हात हातात घेऊन, नव्याकोऱ्या महागड्या गाडी शेजारी उभं राहून तिने हा फोटो पोस्ट केला आहे आणि “आवडी आली” असं म्हटलं आहे. यावर आता धनंजयने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अंकिताचा तिच्या नवीन गाडीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “मला मुंबईत फिरायला गाडी नव्हती. मग म्हटलं अंकिताला लग्नाच गिफ्ट गाडी द्यावी. म्हणून मी गाडी गिफ्ट दिली. परत आता काय मागू नको”.

आणखी वाचा – जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”
यापुढे त्याने खास कोल्हापुरी भाषेत “कसाय सुपला शॉट” असंही म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिता वालावलकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे आणि या चर्चेत आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे तिच्या या नवीन गाडीची. किताने नव्या गाडीविषयी पोस्ट शेअर करण्याआधी ‘तुम्ही तयार आहात का?’, ‘ती आलीये, वाट बघतेय’ अशा उत्सुकता वाढवणाऱ्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्या होत्या.
आणखी वाचा – “आवडी आली” म्हणत अंकिता वालावलकरने घेतली महागडी आलिशान कार, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला खास फोटो
दरम्यान, अंकिताच्या आयुष्यात सध्या आनंदी वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांवर तिचे लग्न आले असताना एक नवीन आलिशान महागडी कार तिने खरेदी केली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणाल लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे आता त्यांचे अनेक चाहते मंडळी लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.