शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्…; नात्याला वेगळंच वळण

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 6:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva marathi serial update shiva and Ashu;s relation different turn know more

शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्...; नात्याला वेगळंच वळण

झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. यापैकी ‘शिवा’ ही मालिकाही सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत असून त्यांच्यावर चाहत्यांचे विशेष प्रेम असल्याचे दिसून येत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे.  शिवाला आशूबरोबर लग्न करायचे होते, मात्र आशूला हे लग्न करायचे नव्हते.

मात्र आता दोघांचेही लग्न झाले असून त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. आशुबरोबर लग्न झाल्यानंतर शिवाचं आयुष्य पूर्णतः बदललं. हे लग्न शिवा व राम भाऊ सोडून कोणालाच मान्य नसलेलं पाहायला मिळालं. आशुनेही शिवाला बायकोचा दर्जा दिला नाही. त्यामुळे शिवासाठी सासरी वावरणं फार कठीण होऊन बसलं आहे. रामभाऊंची शिवाला मिळालेली साथ या एका गोष्टीवरचं ती या घरात तग धरुन आहे. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या नवीन प्रोमोमध्ये लग्नाचा गोंधळ झाल्यानंतर आशूला शिवाला उचलून घ्यायला सांगितले जाते. मात्र आशू याला नकार देतो. त्यानंतर रामभाऊ त्याला ही प्रथा असते. त्यामुळे तुला उचलून घ्यावंच लागेल असं म्हणतात. तर पंज्यादेखील त्याला तू शिवाला उचलून घेतलं नाहीस तर शिवा तुला उचलेल असं म्हणतात. त्यानंतर शिवा आशूला उचलतेदेखील. मात्र यामुळे आशू खूपच गोंधळून जातो आणि तो तिथून निघून थेट रुममध्ये निघून येतो. त्याच्या मागोमाग शिवा व रामभाऊही येतात.

आणखी वाचा – “तुला कोणी शिक्षा केली आहे का?”, प्रश्न विचारताच साईराजची बोलती बंद, म्हणाला “मी आगाऊपणा करतो तेव्हा…”

खोलीत येऊन आशू शिवाला बाहेर लोक होती व तिथे सर्वांसमोर गोंधळ नको म्हणून मी तुला काही बोललो नाही असं म्हणत शिवावर हात उचलत असताना रामभाऊ त्याला अडवतात आणि तेही त्याच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा – “खाण्याची पद्धत, ही मुलगीही आवडत नाही”, ‘त्या’ व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना मिताली मयेकरचं उत्तर, म्हणाली, “तुमची कशातच…”

दरम्यान, यामुळे आता मालिकेत काय नवीन वळण येणार?, शिवा-आशू यांच्या नात्यात काय दुरावा येणार? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी मालिकेचे प्रेक्षक आतुर आहेत.  

Tags: marathi entertainment newsmarathi serialsshiva
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Promo

अहिल्यादेवींच्या रागावण्याने किर्लोस्कर कुटुंब कोलमडलं, प्रत्येकाच्या अश्रूंचा पाझर फुटला अन्…; पारू-आदित्यला त्रास सहन होईना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.