शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींच्या रागावण्याने किर्लोस्कर कुटुंब कोलमडलं, प्रत्येकाच्या अश्रूंचा पाझर फुटला अन्…; पारू-आदित्यला त्रास सहन होईना

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2024 | 6:55 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Promo

अहिल्यादेवींच्या रागावण्याने किर्लोस्कर कुटुंब कोलमडलं, प्रत्येकाच्या अश्रूंचा पाझर फुटला अन्…; पारू-आदित्यला त्रास सहन होईना

‘पारू’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेतील कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत एकामागोमाग एक येणारी रंजक वळण प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. सध्या मालिकेत आलेल्या एका मोठ्या रंजक वळणाने ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अवॉर्ड फंक्शन सोहळ्याला अहिल्यादेवींना ऍड शूटचं सत्य समजतं. त्यावेळी साऱ्यांना घाम फुटतो. (Paaru Serial Promo)

अवॉर्ड फंक्शनला अहिल्यादेवी काहीच न बोलता तडक घरी निघून येतात. घरी आल्यानंतर जेव्हा आदित्य त्यांच्यासमोर येतो तेव्हा त्यांचा राग अनावर होतो. अहिल्यादेवी आदित्यच्या सणसणीत कानाखाली लागवतात. आणि इतके दिवस हे सत्य का लपवलं असा सवाल करतात. यावर आदित्य हे सत्य मी सांगण्याचा प्रयत्न केला असं सांगतो. यावर अहिल्यादेवी मात्र काहीच ऐकून घेत नाहीत. त्या आदित्यला दोष देत आजपासून तुझा माझा संबंध संपला असं सांगतात. हे ऐकून आदित्य पूर्णपणे कोलमडतो. तर पारूचीही त्या कानउघडणी करतात.

आणखी वाचा – “तुला कोणी शिक्षा केली आहे का?”, प्रश्न विचारताच साईराजची बोलती बंद, म्हणाला “मी आगाऊपणा करतो तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

एक सत्य लपवल्याने संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. अशातच झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक प्रोमो व्हायरल होतं आहे. या प्रोमोमध्ये संपूर्ण कुटुंब कोलमडलेलं पहायला मिळत आहे. अहिल्यादेवी त्यांच्या खोलीत शांत बसून आहेत. तर श्रीकांत त्यांची समजूत काढताना दिसत आहे. तर इकडे आदित्य रडून रडून पूर्णतः कोसळला आहे. तसेच पारू, मारुती यांचाही डोळ्याला डोळा नसून ते देखील विचारात गाढ बुडालेले दिसत आहेत. तर प्रीतमलाही सगळ्याचा पश्चाताप होतं आहे. भर रात्री न थोपवणाऱ्या पावसात हे आलेलं वादळ तो काळ पुढे लोटताना दिसत आहे.

आणखी वाचा – शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्…; नात्याला वेगळंच वळण

समोर आलेला हा मन हेलावून टाकणारा प्रोमो साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आलेलं हे वादळ केव्हा शांत होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
02 July 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, मिथुन व मीन राशीच्या लोकांना मंगळवारी नोकरी, व्यवसायात होणार चांगलाच फायदा, काय आहे आजच्या दिवसाचे महत्त्व, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.