शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला कोणी शिक्षा केली आहे का?”, प्रश्न विचारताच साईराजची बोलती बंद, म्हणाला “मी आगाऊपणा करतो तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 1, 2024 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi collector fame Simba aka Sairaj Kendre answered on anyone punished him at home? Question

“तुला कोणी शिक्षा केली आहे का?”, प्रश्न विचारताच साईराजची बोलती बंद, म्हणाला “मी आगाऊपणा करतो तेव्हा...”

साईराज केंद्रे हा लहानग्या मुलाचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ हा त्याचा व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर सर्वांचा  आवडता असणारा साईराज सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये साईराज अमोल हे पात्र साकारत आहे. मालिकेतील त्याच्या कामाचंही प्रचंड कौतुक होत आहे. या लहान वयात तो करत असलेल्या कामाबद्दल तो अनेकांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. मालिकेत दिसणाऱ्या अमोलप्रमाणेच साईराज खऱ्या आयुष्यातही अगदी तसाच आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या खास कार्यक्रमात नुकतीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अप्पी आमच्या कलेक्टर या मालिकेच्या कलाकारांबरोबर आदेश बांदेकरांनी खास संवाद साधला. यावेळी साईराजने त्याच्या खास शैलीत सर्वांची मनं जिंकली. यावेळी आदेश बांदेकरांनी साईराजला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर  देताना साईराजने केलेल्या हावभावामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आले.

View this post on Instagram

A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

यावेळी आदेश बांदेकरांनी साईराजशी साधलेल्या संवादात त्याने असं म्हटलं की, “मालिकेत माझे नाव सिंबा आहे आणि माझ्या घरचे नाव साईराज आहे. माझे आई-पप्पा मला लाडाने पिल्ल्या म्हणतात”. तसेच यापुढे त्याने तो बीडला राहत असल्याचेदेखील सांगितले. यापुढे आदेश बांदेकरांनी साईराजला त्याच्या घरी कोण कोण असतं? असं विचारलं. याचे उत्तर देत साईराजने घरी आईवडील व आजी आजोबा असल्याचे सांगितले.

आणखी वाचा – “राजकीय नेत्यांच्या भीतीतून बाहेर पडा आणि…”, शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “धर्म, जात यामध्ये…”

यापुढे आदेश बांदेकरांनी साईराजला “तुला कुणी शिक्षा केली आहे का?” असा प्रश्न विचारला. यावेळी साईराजने “याचं उत्तर काय देऊ तेच कळत नाही आहे” असं म्हणताच सर्वांच्या हशा पिकला. त्यानंतर साईराजने मी जेव्हा आगाऊपणा करतो तेव्हा पप्पा मला शिक्षा करतात” असं म्हटलं.      

आणखी वाचा – “खाण्याची पद्धत, ही मुलगीही आवडत नाही”, ‘त्या’ व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना मिताली मयेकरचं उत्तर, म्हणाली, “तुमची कशातच…”

दरम्यान, सध्या साईराज ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. अप्पी व अर्जुनमध्ये आलेला दुरावा दूर करण्यासाठी अमोल प्रयत्न करत असून त्याने आईवडिलांना आता एकत्र आणले आहे. अनेकजाणं मालिकेतील अमोलच्या भूमिकेचं आणि अभिनयाचंही चाहते कौतुक करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना साईराजला छोट्या पडद्यावर पाहणंही रंजक ठरत आहे.

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newssairaj kendre
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Shiva marathi serial update shiva and Ashu;s relation different turn know more

शिवाच्या वागण्याचा आशूला त्रास, हात उचलताच रामभाऊंनी रोखलं अन्...; नात्याला वेगळंच वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.