मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर ही कलाकार मंडळी त्यांचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतात. अशीच मराठी मनोरंजन सृष्टीतील सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर. मिताली ही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात अहत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. ज्याप्रमाणे तिचे अनेक चाहते मंडळी तिच्या या फोटोंचे कौतुक करतात. तसेच काहीजण तिला तिच्या फोटोंवरुन ट्रोलही करतात आणि याच ट्रोलर्सना अभिनेत्री तिच्या खास अंदाजात उत्तरेही देते.
मिताली तिच्या नवऱ्याबरोबर म्हणजेच सिद्धार्थबरोबर नुकतीच ट्रीपला गेली आहे. सध्या हे दोघे इटलीमध्ये मजामस्ती करत आहेत. यासंबंधीचे अनेक पोस्ट ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत आहेत. याच इटली दौऱ्यातील काही खास फोटो व व्हिडीओ मितालीने टियाच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. पण काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या खाण्यावरुन ट्रोल केलं आहे. मात्र अभिनेत्रीने तिच्या खास शैलीत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – “राजकीय नेत्यांच्या भीतीतून बाहेर पडा आणि…”, शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “धर्म, जात यामध्ये…”
मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा पास्ता खातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. इटलीमध्ये पास्ता खाताना” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने “तुझी खाण्याची पध्दत योग्य नाही” असं म्हटलं आहे. यावर मितालीने “अग्गबाई! काय करुयात मग?, एकदा तुमच्यासारखे रील बनवायचे प्रयत्न करुन बघते मॅम”
तर आणखी एकाने “मला पास्ता आणि ही मुलगी अजिबात आवडत नाही” अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्याच्या या कमेंटवर मितालीने “यावरुनच दिसून येत आहे की तुमची कशातच चांगली चव नाही” असं उत्तर दिलं आहे. मितालीने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
दरम्यान, मिताली-सिद्धार्थ हे वर्षातून एकदा तरी परदेशात ट्रीप करतात आणि याचे काही खास फोटो-व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांचे या ट्रीपचे फोटो व व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.