शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर शिव ठाकरेला २५ लाखपैकी फक्त इतकेच पैसे मिळाले, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “आई-वडिलांच्या तिकीटाचे…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 24, 2024 | 9:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakare talked about he got Rs 11 lakh out of 25 lakh after winning Marathi Bigg Boss see the details

मराठी ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर शिव ठाकरेला २५ लाखपैकी फक्त इतकेच पैसे मिळाले, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “आई-वडिलांच्या तिकीटाचे...”

‘आपला माणूस’ म्हणूण् आपली एक वेगळी ओळख निर्माण करत मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठमोळा कलकार म्हणजे शिव ठाकरे. शिवने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत या चंदेरी दुनियेत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिवने एमटीव्हीच्या ‘रोडीज’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर तो ‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातही झळकला होता. या पर्वाचा विजेता होता. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचेही उपविजेतेपद पटकावले होते.

अशाप्रकारे अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतल्यानंतर या रिअ‍ॅलिटी शोच्या पडद्यामागे घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल शिवने खुलासा केला आहे. शिवने नुकतीच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांना एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली होती याबाबत खुलासा केला आहे. या शोचा विजेता ठरल्यावर त्याला बक्षीस म्हणून २५ लाख देण्यात आले होते. पण यापैकी अर्धीच रक्कम त्याला मिळाली होती असं त्याने म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : होलिका दहनाची तिथी मेष ते मीन राशीला कशी जाणार? कुणासाठी आजचा दिवस असणार अगदी खास? जाणून घ्या…

भारतीने शिवला “बिग बॉस मराठी कसा जिंकलास?” असा प्रश्न विचारला होता. याचे उत्तर देत शिव म्हणाला की, “बिग बॉस मराठी जिंकल्यावर जे पैसे मिळाले, त्यातले अर्धे सरकारने नेले. २५ लाख होते, त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले. माझ्यासाठी उरले १७ लाख, कर कपातीनंतर केवळ ११ लाख रुपये जमा झाले. त्यातूनही मला स्टायलिस्टला पैसे द्यावे लागले, त्यांनी माझ्या आई-वडिलांसाठी विमानाचे तिकीटही काढले नव्हते. त्यामुळे त्यांच्या तिकीटासाठीही मला पैसे द्यावे लागले”.

आणखी वाचा – Video : शाळेमधील दप्तर ते लग्नापूर्वीची बॅग भरण्याचा प्रवास, तितीक्षा तावडेने शेअर केला भावुक व्हिडीओ, बहिणींमधील प्रेम पाहून चाहतेही भारावले

यापुढे त्याने असं म्हटलं की, “मात्र हिंदी बिग बॉसने माझे आयुष्य बदलले. मला एवढा मोबदला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. शो नंतर, एक रील, पाहुणे कलाकार आणि सर्व पोस्ट करण्यासाठी मला मोठी रक्कम मिळायची. त्यामुळे मी एका महिन्यात एवढी कमाई करू असे कधीच वाटले नव्हते”. दरम्यान, शिवने या मुलाखतीत त्याच्या प्रवासाबद्दल अनेक गप्पा मारल्या. तसेच आगामी काळात त्याच्या नवीन चित्रपटांबद्दलही त्याने सांगितले आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newsshiv thakare
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Ketaki Mategaonkar appealed PM narendra modi and CM eknath shinde about nature and development by sharing a post

“निसर्गसौंदर्याशी तडजोड करुन...”, केतकी माटेगांवकरची ‘ती' पोस्ट चर्चेत, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाली, “यावर आपण मिळून... ”  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.