बिग बॉस १६ने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी बिग बॉसचे प्रत्येक स्पर्धक काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात. यंदाच्या बिग बॉस १६ चा मानकरी एमसी स्टॅन ठरला तर शिव ठाकरे हा उपविजेता ठरला. एमसी स्टॅनने बिग बॉसच्या विजेतेपदावर नाव कोरले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाचा ताबा शिव ठाकरेने घेतला आहे. (Shiv thakare raj thackeray)
मराठी बिग बॉसमुळे शिवला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली तर हिंदी बिग बॉसमुळे तो विशेष चर्चेत आला. शिव ठाकरे हा बिग बॉसचा विजेता नसला तरी त्याने सर्व प्रेक्षकांची मनं मात्र जिंकून घेतली आहेत. शिव ठाकरेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीमागचे कारण ही त्याने स्पष्ट केले आहे. भेटीदरम्यान नेमकी कशाबद्दल चर्चा झाली यावर शिव ठाकरेने भाष्य केले आहे.
पहा का घेतली शिवने राज ठाकरेंची भेट – (Shiv thakare raj thackeray)
शिव ठाकरेने शनिवारी २५ फेब्रुवारी राज ठाकरेंची भेट घेतली. भेट घेण्यासाठी तो त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्याने राज ठाकरेंचीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर शिव ठाकरेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या भेटीबद्दल भाष्य करत माहिती दिली आहे. (Shiv thakare raj thackeray)
“राज ठाकरेंनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो तेव्हा राज ठाकरे कायमच शाबासकी देतात आणि त्याची त्यावेळी खरंच खूप गरज असते. राज ठाकरेंनी मला त्यासाठीच बोलवलं होतं. दरम्यान तिथे राज ठाकरेंच्या पत्नी, उर्वशी ठाकरे उपस्थित होत्या. त्या आमच्या बिग बॉसच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत. राज ठाकरे हे मराठी मुलं किंवा मुली पुढे जात असतील तर नेहमीच त्यांना शाबासकी देत असतात आणि यापूर्वीही त्यांनी दिली आहे.”
====
हे देखील वाचा – कोकणची लोकधारा जपत प्रभाकर मोरेंनी फॉरेनर्सला लावले थिरकायला
====
याशिवाय बोलताना शिव असेही म्हणाला की, “मला मराठीतील अनेक मोठ्या दिग्दर्शकांकडून खूप ऑफर आल्या आहेत. मला मराठी आणि हिंदी दोन्हीकडे काम करायचं आहे. मात्र सध्या मी ‘खतरों के खिलाडी’ साठी तीन महिन्यांसाठी बाहेर चाललो आहे. मला सर्वकाही करायचे आहे आणि आता मला मी नेमकं काय काय करु असा प्रश्न मला पडलाय. ज्या गोष्टींची मी वाट पाहिली ते आता होत आहे. एका मराठी चित्रपटाचे शूटिंगही १० दिवसात सुरु होणार आहे. पण मी मराठीमध्ये प्राधान्याने काम करेन”. (Shiv thakare raj thackeray)
शिवच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींमध्येही शिवची क्रेझ पाहायला मिळाली. आता शिव नेमका कोणत्या चित्रपटात झळकणार याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.