मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले असून मराठी सिनेसृष्टी खंबीरपणे सिनेविश्वात पाय रोवून कित्येक वर्ष उभी आहे. एकामागोमाग एक वेगवेगळ्या जॉनरच्या मराठी चित्रपटांची निर्मिती प्रेक्षकांसाठी करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांचे चित्रीकरण हे थेट लंडनला होतानाचे चित्र पाहायला मिळतंय. (onkar bhojne new movie)
लंडनला चित्रीकरण होणाऱ्या चित्रपटांची थेट रांगच लागली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशातच भर घालत आणखी एका मल्टीस्टारर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि या चित्रपटाचे चित्रीकरणही लंडनला होणार आहे. कलावती असे या चित्रपटाचे नाव असून मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
रोमँटिक चित्रपटांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा दिग्दर्शक संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. याआधी ही संजय जाधव यांनी ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘तू ही रे’, ‘खारी बिस्किट’, ‘ये रे ये रे पैसा’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांचे दिग्दर्शन करून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. आता ते कलावती या चित्रपटातून पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तब्बल चार वर्षांनी संजय जाधव यांची अनोखी कलाकृती मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. (onkar bhojne new movie)
हे कलाकार साकारणार भूमिका(onkar bhojne new movie)
‘कलावती’ या सिनेमात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, अभिजित चव्हाण, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, संजय शेजवळ, नील साळेकर (इन्फ्लूएन्सर) या कलाकारांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच वेड प्रेक्षकांनाही लागलंय. या चित्रपटाची कथा लेखक अभिजित गुरुने लिहिली आहे. तर अमेय खोपकर हे या सिनेमाच्या निर्मितीची धुरा पेलवत आहेत. (onkar bhojne new movie)
====
हे देखील वाचा – ‘दुनिया डोक्यावर घेणार हाय रं….’ ओंकार ने सांगितला व्हायरल गाण्यांमागचा किस्सा
====
नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या पोस्टरमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरचा मराठमोळा लूक पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये अमृताचा लूक पाहून चित्रपटात ती लावणीसम्राज्ञी असल्याची चर्चा आहे. ‘कलावती’ या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमृता आणि ओंकार ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कलावती’ हा बिग बजेट सिनेमा असून या चित्रपटाने ओंकारला चांगली संधी मिळाली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न नुकताच पार पडला असून लवकरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल.