शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही वेगळे झालो आहोत आणि…”, शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यामध्ये बिनसलं, ट्वीटमुळे चर्चांना उधाण, म्हणाला, “कठीण काळात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 20, 2023 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shilpa Shetty and Raj Kundra divorce Rumours

"आम्ही वेगळे झालो आहोत आणि…", शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यामध्ये बिनसलं, ट्वीटमुळे चर्चांना उधाण, म्हणाला, "कठीण काळात…"

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा यांनी ट्विटरवरुन नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सर्वांना धक्का बसला आहे. राज कुंद्रा याने त्यांच्या ट्विटरच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून वेगळे होण्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये मात्र शिल्पाचा उल्लेख न करता त्यांने लिहिले आहे की, “आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती करतो.” राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी २००९साली लग्न झालं. त्यांना विआन व समिशा अशी दोन मुले आहेत. (Shilpa Shetty and Raj Kundra divorce Rumours)

राज कुंद्रा याने केलेल्या गुपित पोस्टने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. अद्याप या पोस्टमागील गुपित उलगडलं नाही आहे. त्यामुळे खरंच शिल्पाचा घटस्फोट होणार की नाही हे समोर आलेलं नाही. दरम्यान राज कुंद्रा याच्या या पोस्टला पाहता सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. काहींनी त्याचा बायोपिक ‘UT 69’ रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाला घेऊन केलेलं “प्रमोशनल गिमिक” असावं असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : “अररा बाप…”, भारताने बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर गौरव मोरेचा एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल

तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “दुःख! खरंच धक्कादायक बातमी आहे.” तर आणखी एका युजरने कमेंट करत प्रश्न करत म्हटलं आहे, “विभक्त म्हणजे? घटस्फोट?”. अलीकडेच, राज कुंद्रा त्याच्या बायोपिक ‘UT 69’ च्या ट्रेलर लाँचच्या वेळी पोर्न स्कँडलमध्ये तुरुंगात असलेल्या त्याच्या काळाबद्दल बोलत असताना भावुक झालेला पाहायला मिळाला. दरम्यान त्याने रडत म्हटलं, “फॅमिली पे मत जाओ यार, क्या बिगडा है मैं?”.

We have separated and kindly request you to give us time during this difficult period ????????

— Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023

आणखी वाचा – “बसा तरी म्हणायचं होतं”, ‘त्या’ व्हिडीओवरून अशोक मामांना बोलणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले, “एकदा विचारा तरी…”

तसेच पत्रकार परिषदेच्या दुसर्‍या भागात राज म्हणाला, “मी फक्त वेदनांमुळे मास्क घातला होता. मीडियाला सामोरं जाणं खूप वेदनादायक होतं. खरं तर, माझ्या कायदेशीर चाचणीपेक्षा ते अधिक वेदनादायक होतं. मी मीडियाला दोष देत नाही कारण ते त्यांचे काम करत होते परंतु ते इतकं वेदनादायक होतं की, मला मुखवटा घालून फिरावं लागलं.”

Tags: entertainmentraj kundraRaj Kundra controversial statement at UT 69 Trailer launchshilpa shettyshilpa shetty and raj kundra divorce rumoursut 69
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Rutuja Bagwe on Anaghaa Atul

सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा, मराठी कलाकरांची जमली गर्दी, स्वतःच्या हाताने जेवण वाढलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.