रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये”, बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, म्हणाली, “आईबाप व्हायचं म्हणून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sheeba chadha Single mother

"सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये", बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक विधान, म्हणाली, "आईबाप व्हायचं म्हणून…"

sheeba chadha Single mother : जगात असे अनेक पालक आहेत जे एकट्याने आपल्याला मुलाबाळांचा सांभाळ करतात. विशेषतः महिला कलाकार मंडळी आपल्या मुलांना सिंगल मदर म्हणून वाढवत असल्याचं अनेकदा कानावर येतं. डिवोर्सनंतर म्हणा वा नवऱ्याचे निधन झाल्यानंतर या महिला त्यांच्या मुलांचा एकट्याने सांभाळ करतात. आणि हो यांत अनेक नामांकित अभिनेत्रींचा समावेश आहे. अशावेळी त्यांना समाजाकडून अनेक टोमणेही खावे लागतात. यादरम्यान आलेल्या अनेक अडचणींचा त्यांनी सामनाही केला. यापैकी एक नाव म्हणजे बॉलिवूड सिनेविश्वात अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी शिबा चड्ढा.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शिबा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. या मुलाखतीत शिबा यांनी सध्याच्या काळात मूल जन्माला घालणं का कठीण आहे हे सांगितलं आहे. शिबा म्हणाल्या, “सिंगल आई होणं खूप कठीण आहे. अनेक बाजूंनी हे अवघड असते. काहीही झालं तरी तुम्हाला बाळासाठी त्याक्षणी हजर राहावं लागतं. मी प्रत्येक सिंगल आईचं दुःख समजू शकते. पूर्वी पूर्ण गाव तुमच्या बाळाची काळजी घ्यायचं. परंतु, कुटुंब छोटं होत गेलं तशी समस्या आणखी वाढली. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी अनेक चांगल्या ऑफर्स नाकारल्या”.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न, नवऱ्याचा फोटोही समोर, नावाच्या बाबतीत जुळून आला योगायोग

View this post on Instagram

A post shared by Sheeba Chadha (@sheeba.chadha)

पुढे त्या म्हणाल्या, “मला वाटतं सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये. या काळात बाळाला एकट्याने सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचा पगार कमी पडतो. आपण मुलं का जन्माला घालतो, याचा विचार लोकांनी खोलवर करायला हवा. फक्त समाज काय म्हणेल किंवा आईबाप व्हायचंच आहे या हेतूने मूल जन्माला घालणं चुकीचं आहे. त्यांच्या मते, सध्याच्या जगात मुलांना वाढवणे अधिक कठीण झाले आहे. महागाई, बदलती जीवनशैली, कुटुंबातील तणाव आणि एकटेपणा यामुळे आजच्या पालकांनी जबाबदारी घेऊनच मूल जन्माला घालावे”.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पहिल्यांदाच कोकणात घेतोय भातशेतीचा आनंद, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “चिखलात काम करुन…”

‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल्ली ६’, ‘गली बॉय’, ‘मर्डर’ या चित्रपटातून शिबा चड्ढा प्रेक्षकांच्या भेटीस आली. शेवटची ती ‘बकैती’ या चित्रपटात दिसली. यानंतर आता अभिनेत्री आगामी रामायण या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती मंथराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: bollywood actresssheeba chadhasingle mother
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Monika Dabade Lovestory

कॉलेजदरम्यान मैत्री, प्रेम अन्…; 'ठरलं तर मग'च्या अस्मिताची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी, म्हणाली, "याचं दुसरीकडे जुळलेलं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.