गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पहिल्यांदाच कोकणात घेतोय भातशेतीचा आनंद, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “चिखलात काम करुन…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 8, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
maharashtrachi hasiyajatra fame actor video

Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पहिल्यांदाच कोकणात घेतोय भातशेतीचा आनंद, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "चिखलात काम करुन…"

maharashtrachi hasiyajatra fame actor video : कोकण म्हणजे स्वर्ग. आणि पावसात कोकणात जाण्याचे सुख काही औरच. अशातच मुसळधार पावसाने कोकणाला स्वर्ग बनवून टाकलं आहे. अनेकजण या स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी कोकण दर्शन घेताना दिसत आहेत. यांत कलाकार मंडळीही मागे राहिलेले नाहीत. अनेक कलाकार कोकणात जात तिथे एन्जॉय करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर कोकणात सध्या शेतीला सुरुवात झाली असून ते या शेतीचा अनुभवही घेताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी कोकणात जात शेती करतानाचा अनुभव सोशल मीडियाद्वारे पोस्ट केला आहे. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने कोकणात जात शेतीचा अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बने हा कोकणातीलच आहे. चिपळूण हे निखिलचे गांव. निखिल बऱ्याचदा कोकणातील अनेक व्हिडीओ, फोटो इंस्टाग्रामद्वारे शेअर करताना दिसतो. निखिल आणि त्याच कोकण प्रेम जगजाहीर आहे. निखिलच त्याच्या गावावर विशेष प्रेम आहे आणि नेहमीच तो गावाकडील आठवणी ताज्या करताना दिसतो. अशातच आता निखिल पुन्हा एकदा कोकणात पोहोचला आहे. मात्र, यावेळी तो स्वतःच्या गावी नाही तर कोकणी रानमाणूस म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रसाद गावडेच्या भेटीस गेला आहे.

आणखी वाचा – प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न, नवऱ्याचा फोटोही समोर, नावाच्या बाबतीत जुळून आला योगायोग

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

गावाकडे जातानाचा सुंदर असा व्हिडीओ निखिलने बनवला आहे. या व्हिडीओमध्ये तो हा प्रवास सांगत असं म्हणतो, “ठाण्यात जनशताब्दी एक्स्प्रेस पकडली आणि निसर्गाचा आनंद घेत, आम्ही येऊन पोहोचलो सावंतवाडीला. सावंतवाडीला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आम्ही जेवलो आणि त्यानंतर कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडेच्या जीवनशाळाला भेट द्यायला. यानिमित्ताने माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. प्रसादला भेटून खूप आनंद झाला. मग आम्ही भातलावणी करायला गेलो. भातलावणीची ही माझी पहिलीच वेळ होती. पण खूप काही शिकायला मिळालं. पावसात, चिखलात काम करून प्रसन्न वाटलं आणि काम केल्याचं तसंच नवीन काही तरी शिकल्याचं समाधान मिळालं. रात्री येऊन पुन्हा गप्पा रंगल्या. प्रसादशी बोलणं म्हणजे वैचारिक मेजवानी आहे.”

आणखी वाचा – गरोदर असताना मुद्दाम टाईट कपडे घालायला सांगितले आणि…; निर्मात्याबाबत राधिका आपटेचे खळबळजनक आरोप, हॉलिवूड-बॉलिवूड इंडस्ट्रीची केली तुलना

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये, निखिल चिखलात जात स्वतः भातलावणी करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओमधून कोकणातील पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या साधेपणाचं कौतुक होतं आहे. तर काहींनी कमेंट करत त्याचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Kushal Badrike video

नाचणाऱ्या बाईला पाहणं कुशल बद्रिकेला पडलं महागात, 'तो' व्हिडीओ पाहून बायकोने घेतला समाचार, म्हणाली, "घरी या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.