prajakta gaikwad engagement : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या लग्नाची बरेच दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अखेर प्राजक्ताने #ठरलं म्हणत लग्नाची बातमी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना दिली. तेव्हापासून प्राजक्ता केव्हा लग्नबंधनात अडकणार?, तिचा होणारा नवरा कोण आहे याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. दरम्यान, अभिनेत्रीने थेट तारीख सांगत साखरपुड्याची खुशखबर दिली. अभिनेत्रीचा ७ ऑगस्टला साखरपुडा समारंभ पार पडणार असल्याचं समोर आलं.
अखेर काल अभिनेत्रीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून, या सोहळ्याचे काही खास फोटोही समोर आले आहेत. या फोटोंमधून तिच्या नवऱ्याचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. तसेच तिच्या जोडीदाराचे नावही फार खास असल्याचे उघड झाले आहे. ‘कुंकवाचा कार्यक्रम’, असे कॅप्शन देत तिने लग्नाआधीच्या विधींचे फोटो शेअर करत लग्नाची गुडन्यूज दिली. त्यानंतर काल अभिनेत्रीचा अखेर साखरपुडा समारंभ अगदी थाटामाटात संपन्न झाला.
आणखी वाचा – “आठवणींनी झोळी भरली पण…”, ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, “माझ्या मर्यादा…”
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव ‘शंभुराज’ असल्याचंही काल समोर आलं. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाईंची म्हणजेच छत्रपती संंभाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नावही ‘शंभुराज’ असल्याने हा योगायोग चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा ठरला. याआधी प्राजक्ताच्या मेंदीचे काही फोटो समोर आलेले, ज्यात तिने ‘SP’ असे नाव लिहिले होते. S नेमका कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी प्राजक्ताचे चाहते उत्सुक होते.
अखेर शंभुराज आणि प्राजक्ता यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. प्राजक्ताने अगदी शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ उरकला. प्राजक्ता व शंभूराज यांच्या साखरपुडा समारंभातील शाही लूकही साऱ्यांच्या पसंतीस पडला. साखरपुड्याची फोटो समोर येताच प्राजक्ता व शंभूराज यांच्यावर सिनेविश्वातील कलाकार मंडळींकडून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





