गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॉलेजदरम्यान मैत्री, प्रेम अन्…; ‘ठरलं तर मग’च्या अस्मिताची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी, म्हणाली, “याचं दुसरीकडे जुळलेलं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Monika Dabade Lovestory

कॉलेजदरम्यान मैत्री, प्रेम अन्…; 'ठरलं तर मग'च्या अस्मिताची फिल्मी स्टाईल लव्हस्टोरी, म्हणाली, "याचं दुसरीकडे जुळलेलं…"

Monika Dabade Lovestory : ‘ठरलं तर मग’ या मालिकेने रसिकांच्या मनात घर केलं. ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांनी ही मालिका अव्वल स्थानावर आणली आहे. या मालिकेतील एक पात्र जे नेहमीच चर्चेत राहिलं आहे ते म्हणजे अस्मिता म्हणजेच मोनिका दाबाडे. मोनिकाला ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मोनिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. चार महिन्यांपूर्वीच मोनिका आई झाली. लग्नाच्या दहा वर्षांनी मोनिका व चिन्मय यांनी चिमुकलीचे स्वागत केले. पण तुम्हाला मोनिका आणि चिन्मय यांची लव्हस्टोरी माहित आहे का?.

फ्रेंडशिप डेचे औचित्य साधत मोनिका व चिन्मय यांनी ‘इट्स मज्जा मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना मोनिकाच्या नवरा चिन्मय म्हणाला, “पुण्यातील दिवाळीच्या एका इव्हेंटच्या सूत्रसंचालनासाठी मला आणि मोनिकाला विचारण्यात आलं. त्यावेळी मी आणि मोनिका पहिल्यांदा भेटलो. आणि आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही बोलू लागलो, एकमेकांना ज्ञान देऊ लागलो, जो ज्या गोष्टीत तरबेज आहे ती गोष्ट आम्ही एकमेकांशी शेअर करु लागलो. आणि बोलता बोलता आमच्यातील मैत्री वाढत गेली”.

आणखी वाचा – “आठवणींनी झोळी भरली पण…”, ‘शिवा’ला निरोप देताना पूर्वा कौशिकच्या डोळ्यांत पाणी, म्हणाली, “माझ्या मर्यादा…”

पुढे चिन्मय म्हणाला, “एकमेकांबद्दलच आकर्षण वाढलं. आणि मग या मैत्रीण एक पाऊल पुढे टाकावं अशा गोष्टी सुरु झाल्या. आणि यासाठी वेळ एकत्र घालवणं अधिक महत्त्वाचं असल्याने मी एकत्र एक नाटक करण्याचा घाट घातला. यावर मोनिका म्हणाली, “आजही सगळे चिन्मयला चिडवतात की मोनिकाला पटवण्यासाठी हे नाटक त्याने केलं आहे”. पुढे चिन्मय म्हणाला, “ते नाटक आम्ही केलं, आणि इकडे आमच्या आयुष्याचं नाटकही झालं”.

आणखी वाचा – सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या वडिलांचे निधन, ८८ व्या वर्षी कर्करोगाशी लढाई अपयशी, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

यावर मोनिकाने तिचं मत मांडत म्हटलं, “मी पहिल्यांदा जेव्हा चिन्मयला भेटले तेव्हा मला असं झालं हा कोण आहे मुलगा?, आणि मुलं आपल्याला भाव देतात या हेतूनं तेव्हा मी थोडी माजातच होते. कालांतराने मला असं कळलं की, याच दुसरीकडे जुळलं आहे म्हणून मी मग विषयच सोडला. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि आम्ही नाट्यदरम्यान एकत्र भेटलो. आमच्यातील संवाद वाढला तेव्हा याचा स्वभाव लक्षात आला. एक चांगला, समजूतदार स्वभाव असल्याचं जाणवलं आणि मग आपण पुढे जायला हरकत नाही याची खात्री झाली”.

Tags: monika dabadeMonika Dabade LovestoryTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Monika Dabade Surname

"मी माझं आडनाव कधीच बदलणार नाही", लग्नाला १० वर्ष होऊनही मोनिका दबडे लावते माहेरचंच नाव, म्हणाली, "नवऱ्याच्या घरी जाऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.