Shatrughan Sinha Son luv Sinha : अल्पावधीतच ‘गदर २’ या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर या कलाकारांना पाहणं रंजक ठरलं. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हाही यानेही उत्तम काम केलं. चित्रपटात त्याने सिमरत कौरच्या भावाची भूमिका साकारली आहे. पडद्यावर कमी वेळेसाठी जरी तो दिसत असला तरी तो सतत बाजूला आहेच. आणि त्याचे संवादही नावापुरतेच आहेत.
२०१० मध्ये ‘सदियां’ मधून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र वडील आणि बहिणीप्रमाणे त्याने स्वतःच नाव सिनेसृष्टीत कमावलं नाही. एका मुलाखतीत लव सिन्हा याने त्यांच्या प्रवासाबद्दल आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल सांगितले. लवने भाष्य करत म्हटलं की, त्याच्या वडिलांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींना मदत केली होती. पण त्याला कोणीही मदत केली नाही. सिद्धार्थ कन्ननसोबत झालेल्या मुलाखतीत त्याने स्पष्टपणे सांगितलं की, ‘त्याच्या वडिलांनी बनावट लोकांना ओळखले आहे, परंतु तरीही ते त्यांना संधीचा फायदा घेऊ देतात’.
सोनाक्षी सिन्हाचा भाऊ अभिनेता लवने सांगितले की, “माझ्या वडिलांना हे माहित असतं की समोरची व्यक्ती चुकीची आहे, तरी ते इतरांना संधी देतात. इंडस्ट्रीत असे अनेक मोठे लोक आहेत ज्यांना त्यांनी मदत केली पण त्यांच्या मुलाला कोणीही मदत केली नाही. इतकंच नव्हे तर लवपुढे असेही म्हणाला की, “त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ असलेल्या एका व्यक्तीने लवला एका अभिनय कार्यशाळेत पाहिले होते आणि त्याला अभिनय करताना देखील पाहिले होते. त्यांनी मनात आणलं असत तर ते त्याला काम देऊ शकले असते पण त्यांनी तसे केले नाही.

यापुढे बोलताना लव असेही म्हणाला की, अनेक अभिनेत्यांच्या वाटेला फ्लॉप चित्रपट आले आहेत मात्र त्यांना त्यांनंतरही अनके संधी मिळाल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलासोबत मात्र असं काही घडलं नाही. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची दुसरी संधी मिळाली नाही. त्याची बहीण सोनाक्षी सिन्हाबद्दलही बोलताना तो म्हणाला, “कोण खोटे आहे आणि कोण खरे आहे याचा अंदाज ती लावू शकत नाही. ती लोकांच्या हेतूंकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे तिला कोणत्या प्रकारचे लोक भेटतात यावर तिने लक्ष ठेवले पाहिजे”.