करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो सध्या विशेष चर्चेत आला आहे. आजवर या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अनेक कलाकार या कार्यक्रमाला येऊन व्यक्तिगत वा व्यावसायिक खुलासे करताना दिसतात. अशातच ‘कॉफी विथ करण’चा नुकताच समोर आला असून हा भाग अधिक लक्षवेधी ठरत आहे. कारण या नव्या एपिसोडमध्ये सैफ अली खान त्याची आई शर्मिला टागोरसह पोहोचलेला पाहायला मिळाला. यादरम्यान शर्मिला टागोर यांनी सैफ व अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच मौन सोडले. (Sharmila Tagore And Saif Ali Khan)
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ८’ च्या नव्या भागात शर्मिला टागोरने सैफ अली खान व अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर मोकळेपणाने भाष्य केलेलं पाहायला मिळालं. ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितले की, “कुटुंबासाठी हा आनंदाचा काळ नव्हता. त्यावेळी केवळ सैफलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला अमृताला, सारा अली खान व इब्राहिम अली खान यांना गमावण्याचे दु:ख सहन करावे लागले होते. अमृतापासून वेगळे होण्याचा निर्णय शर्मिलाला सर्वप्रथम कळाला असल्याचं तिने यावेळी सांगितलं.
यावर बोलताना सैफ म्हणाला, “आम्ही वेगळं होण्यापूर्वी मी ज्या पहिल्या व्यक्तीशी बोललो ती माझी आई होती. तेव्हा मला आई म्हणाली, “तुला हेच हवे असेल तर मी तुझ्याबरोबर आहे”. आईच्या या वाक्यामुळे मला खूप मदत झाली. शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही बरीच वर्ष एकत्र असता, तुम्हाला सुंदर मुलं असतात, तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय हा काही सोप्पा नसतो. अशावेळी जुळवून घेणं फार कठीण असतं हे मला चांगलंच माहित आहे. ही वेळ चांगली नव्हती तरीपण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
यावर शर्मिला म्हणाली, “हे फक्त वेगळं होण्यापुरतेच मर्यादित नाही तर त्यात इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. आमच्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता कारण इब्राहिम फक्त तीन वर्षांचा होता आणि आमचं मुलांवर खूप प्रेम होतं. विशेषतः टायगरचे इब्राहिमवर मनापासून प्रेम होते. त्याला हवा तेवढा वेळ त्याच्याबरोबर घालवता आला नाही. त्यामुळे अमृता व दोन्ही मुलं दूर गेल्यानंतर आम्हाला दुहेरी नुकसान झाले. केवळ सैफलाचं नाही तर आम्हालाही सगळ्याशी जुळवून घ्यावं लागलं” असंही त्या म्हणाल्या.