रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जे राष्ट्र गीत व्हायला हवं होतं ते दुर्दैवाने…”, शरद पोंक्षे यांचं मोठं विधान, काँग्रेसचाही केला उल्लेख, म्हणाले, “भारताला याचे परिणाम…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 17, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sharad Ponkshe talked about vande mataram and he said it should be national anthem see the details

“जे राष्ट्र गीत व्हायला हवं होतं ते दुर्दैवाने...”, शरद पोंक्षे यांचं मोठं विधान, काँग्रेसचाही केला उल्लेख, म्हणाले, “भारताला याचे परिणाम...”

मराठी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्यांमध्ये शरद पोंक्षे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आपली परखड भूमिका आणि रोखठोक वक्तव्य यामुळे ते कायमच चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळेदेखील प्रसिद्धी झोतात येत असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पोंक्षे यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात त्यांनी ‘वंदे मातरम’ हे दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं आहे असं म्हटलं आहे.

शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते भाषण देताना दिसत आहेत. या व्हिडीओला ‘वंदे मातरम’ असं कॅप्शन देत त्यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताबद्दलचा इतिहास सांगितला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “वंदे मातरम आणि जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत. पण दुर्दैवाने जे आपलं राष्ट्रगीत व्हायला हवं होतं, ज्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळायला हवा होता, ते आज आपलं राष्ट्रीय गीत झालं आहे. मी परवाच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हिंदी राष्ट्रवाद सांगितला, जो काँग्रेसने स्वीकारला.”

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

आणखी वाचा – ‘कुण्या राजाची तू गं राणी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट, म्हणाले, “प्रवास थांबत असला तरी…”

यापुढे त्यांनी या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “मुळात ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची उभारणीच हिंदी राष्ट्रवादावर केली. जेणेकरून राष्ट्रीय काँग्रेस कधीही पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करू शकणार नाही. हा हिंदी राष्ट्रवाद हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतिक मानला गेला आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भारताला जे परिणाम भोगावे लागले. त्यातला सगळ्यात पहिला परिणाम कोणाला भोगावा लागला असेल तर तो बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘वंदे मातरम’ या गीताला.”

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन, गायकाच्या आईने दिला बाळाला जन्म, वडिल फोटो शेअर करत म्हणाले…

दरम्यान, शरद पोंक्षेंच्या या व्हिडीओखाली अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुणी त्यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली आहे, टर कुणी त्यांच्या या वकतव्याला विरोड केला आहे. तसेच त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात श्रेयस तळपदे व गौरी इंगावलेसह त्यांचीदेखील प्रमुख भूमिका पाहायला मिळाली.     

Tags: marathi actormarathi entertainment newssharad ponkshe
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Anuradha Paudwal decided not to sing in Bollywood due to comparisons with . late singer Lata Mangeshkar see the details

लता मंगेशकरांशी तुलना झाल्यामुळे अनुराधा पौडवाल यांचा बॉलिवूडला अलविदा, स्वत:चा खुलासा करत म्हणाल्या, “संगीताला महत्त्व...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.