अनेक मुलांना बालपणापासून काहीतरी मोठं बनण्याची इच्छा असते, त्यानुसार ते आपापल्या परीने अनेक प्रयत्न करत असतात. सिनेसृष्टीतील बरीच मंडळी आहेत, त्यांची मुले आपल्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळली व यशस्वी झाली. पण काही मंडळी अशी आहे, त्यांना मनापासून वाटतं की आपल्या मुलाने अभिनय क्षेत्राकडे न वळता त्यांच्या इच्छेनुसार काहीतरी वेगळं करावं. अशीच एक इच्छा मराठी मनोरंजनसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीची होती, जी आज पूर्ण झाली. ती म्हणजे आपल्या उत्तम अभिनयाने ओळखले जाणारे अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक सिध्दी. (sharad ponkshe)
अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिध्दी पोंक्षे हिने वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून तिला यामध्ये यश मिळालेले आहे. अतिशय खडतर परिस्थितीत सिद्धी हिने प्रचंड मेहनत करून बारावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवले होते. त्यानंतर ती वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेली होती. आता लेक वैमानिक झाल्यामुळे वडील शरद पोंक्षे यांना प्रचंड आनंद झाला असून लेकीला मिळालेल्या या यशाबद्दल अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
लेक पायलट झाल्याबद्दल शरद पोंक्षेंनी भावना केल्या व्यक्त (sharad ponkshe daughter becomes pilot)
शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट केली, ज्यात त्यांची लेक सिद्धी दिसत असून तिच्या या यशाबद्दल व्यक्त होताना शरद पोंक्षे लिहितात, “कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता ४थी पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.” दरम्यान सिद्धीला मिळालेल्या या यशाबद्दल चाहत्यांनी सिद्धी व अभिनेते शरद पोंक्षे यांचे अभिनंदन केले आहे. (sharad ponkshe daughter becomes pilot)
अभिनेते शरद पोंक्षे मालिका, सिनेमा व छोटा पडदा या तीनही माध्यमांवर चांगले सक्रिय आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात त्यांना आजारपण, कोरोना लॉकडाउन व त्यामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती अश्या अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होता. मात्र या सगळ्यांवर त्यांनी मात दिली आणि मनोरंजनसृष्टीत दमदार कमबॅक केले. (sharad ponkshe daughter becomes pilot)
