मराठी सिनेविश्वात अशी काही नावं आहेत, जी स्पष्ट व रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे. नाटक, मालिका व चित्रपटांमधून शरद यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. ते सध्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाच्या निमित्ताने राज्याच्या विविध शहरात दौरे करताना दिसत आहे. त्याचबरोबर ते सोशल मीडिया व व्याख्यानांच्या माध्यमातून विविध विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतात. त्यांच्या वक्तव्याची जितकी चर्चा होते, तितकेच वाददेखील निर्माण झाले आहेत. (Sharad Ponkshe talks about his Business)
शरद पोंक्षे यांचं अभिनयाव्यतिरिक्त खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत राहिलं आहे. २०१८ मध्ये त्यांना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला होता. या आजारावर त्यांनी यशस्वीरीत्या मात दिली आणि मनोरंजनविश्वात दमदार कमबॅक केले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात त्यांना आर्थिक परिस्थिती व कोरोना लॉकडाऊन यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी या परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी मिठाईचा व्यवसाय सुरु केला होता.
काही वर्षांपूर्वी ठाणे येथील एका कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी शरद पोंक्षे यांनी त्यांच्या नव्या व्यवसायाबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, “कोरोना काळात मनोरंजन क्षेत्र आर्थिक संकटात आले होते. त्यात २०१९ हे माझ्यासाठी खूप खराब वर्ष होतं. आजारपणामुळे आधीच बँक बॅलन्स संपला होता, त्यात आताशी कुठे काम सुरु झालेलं काम कोरोना लॉकडाऊनमुळे बंद पडलं. घर चालवण्यासाठी आपल्याकडे पैसे असावे म्हणून आपण कायतरी केलं पाहिजे यासाठी मी विचार सुरु केला.”
हे देखील वाचा – ‘वेड’च्या यशानंतर जिनिलिया देशमुख आमिर खानबरोबर काम करताना दिसणार, अभिनेत्रीच्या हाती मोठा चित्रपट
“तेव्हा चार-पाच मित्र एकत्र येऊन आम्ही चितळे बंधू यांना भेटलो. त्यानंतर मी बोरिवली व डोंबिवलीला चितळे एक्सप्रेसची दोन मिठाईची दुकाने सुरु केली. चितळेंची शाखा आम्ही या दोन ठिकाणी सुरु केल्यानंतर मी बोरिवलीचं दुकान सांभाळायचो, तर माझे दोन मित्र डोंबिवलीचं दुकान. तेव्हापासून मी मिठाई विकत आहे.”, असं ते त्यावेळी म्हणाले होते.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेता बॉलिवूड चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार, मराठी मालिकांमध्ये केलंय काम, म्हणाला, “बड्या चित्रपटात मी…”
या नव्या व्यवसायात आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, “जेव्हा मालिकेचा शूट नसतं, तेव्हा मी दुकानामध्ये येऊन बसतो. हा अनुभव खूप भन्नाट आहे. मी दुकानात असताना अनेक महिला येथे येतात. कारण, मिठाईच्या दुकानात पुरुषांपेक्षा महिला मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी येथे येतात. तर मी जेव्हा दुकानांत असतो, तेव्हा तेथे आलेल्या स्त्रियांची कुजबूज सुरु होते. ते दुकानात बसलेली व्यक्ती शरद पोंक्षे आहे का? अशी चर्चा मी नेहमी ऐकत असतो. नंतर त्यातील काही जणी घाबरत मला विचारतात, तुम्ही शरद पोंक्षे यांच्यासारखे दिसता. मग मी कधी मूडमध्ये असलो की त्यांना म्हणतो “कोण शरद पोंक्षे?”. हे ऐकून आमच्या दुकानातील कर्मचारी खो खो हसतात.”