बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निर्मात्याबरोबर एक रात्र…”, अंकिता लोखंडेचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, म्हणाली, “त्याने माझा हात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 13, 2023 | 12:43 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Lokhande Casting Couch

"निर्मात्याबरोबर एक रात्र…", अंकिता लोखंडेचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, म्हणाली, "त्याने माझा हात…""निर्मात्याबरोबर एक रात्र…", अंकिता लोखंडेचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा, म्हणाली, "त्याने माझा हात…"

‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमुळे लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. या मालिकेत तिने साकारलेल्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. कमी कालावधीत अंकिताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अंकिता इथवरच थांबली नाही. तर तिने तिचा प्रवास पुढे नेत आपली पावलं बॉलिवूडकडे वळविली. ‘मणिकर्णिका’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. कामाबरोबरच अंकिता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. अंकिताला हिंदी सिनेसृष्टीत काम करत असताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. तिने २०२१ मध्ये एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्यासोबत कास्टिंग काऊचची घटना घडली होती, या घटनेने तिला खूप मोठा धक्का बसला होता. (Ankita Lokhande Casting Couch)

‘बॉलीवूड बबल’शी बोलताना या घटनेबाबत ती म्हणाली, “बऱ्याच वर्षांपूर्वी मला साऊथच्या चित्रपटासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्या व्यक्तीने मला त्याच्या खोलीत बोलावले आणि विचारले अंकिता, मला तुला काही विचारायचे आहे. या चित्रपटासाठी तुला तडजोड करावी लागेल. त्यावेळी मी १९-२० वर्षांची होते, पण मी खूप हुशार होते. उलट प्रश्न करत मी त्याला विचारले, तुमच्या निर्मात्याला कोणत्या प्रकारची तडजोड हवी आहे, मी पार्टी किंवा डिनरला जावे असे त्याला वाटत आहे का?

आणखी वाचा – वेड’च्या यशानंतर जिनिलिया देशमुख आमिर खानबरोबर काम करताना दिसणार, अभिनेत्रीच्या हाती मोठा चित्रपट

तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुम्हाला निर्मात्याबरोबर एक रात्र एकत्र राहावं लागणार आहे, असं बोलताच मी त्याच्यावर भडकून अगदी स्पष्टपणे म्हणाले, ‘मला असं वाटतंय की तुमच्या निर्मात्याला काम करण्यासाठी मुलगी नको आहे, तर एक रात्र एकत्र घालवण्यासाठी हवी आहे’. असं म्हणून मी तिथून निघाले. यानंतर त्याने माझी माफी मागितली आणि मला चित्रपटात काम करण्यासाठी सांगितले. पण मी चित्रपटासाठी स्पष्ट नकार दिला”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेता बॉलिवूड चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार, मराठी मालिकांमध्ये केलंय काम, म्हणाला, “बड्या चित्रपटात मी…”

टीव्ही विश्वातून चित्रपटसृष्टीत आल्यावर अंकिताबरोबर अशीच एक घटना दुसऱ्यांदा घडली. याबाबत बोलताना अंकिता म्हणाली, “जेव्हा मी चित्रपटसृष्टीमध्ये परतले तेव्हाही मला पुन्हा यातून जावे लागले. मला त्या अभिनेत्याचे नाव घ्यायचे नाही, तो खूप मोठा अभिनेता आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण त्याने माझा हात धरताच मला घाम फुटला आणि मी त्याचा हात सोडला. त्यावेळी मला कळून चुकलं की, इथे मला राहता येणार नाही कारण येथे ‘गेव्ह अँड टेक’ रिलेशन होतं. तिथूनही मी बाहेर पडले”.

Tags: ankita lokhandeankita lokhande jainankita lokhande on casting couchcasting couchentertainmentpavitr rishtatv actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Next Post
Tharla tar Mag Record-break TRP ratings

Video : TRPमध्ये ‘ठरलं तर मग’ मालिका ठरली नंबर वन, सेटवरच बेभान होऊन नाचल्या पूर्णा आजी व सायली, व्हिडिओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.