शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सुख म्हणजे…’ फेम माधवी निमकरची चाहत्यांसाठी खास पोस्ट, कपिल होनरावबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “शालिनी-मल्हारचा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 22, 2023 | 9:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhavi Nemkar emotional post

'सुख म्हणजे…' फेम माधवी निमकरची चाहत्यांसाठी खास पोस्ट, कपिल होनरावबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, "शालिनी-मल्हारचा…"

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरु झाली असून या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. जयदीप-गौरीची सुंदर केमिस्ट्री असो, किंवा शिर्के कुटुंबियांचं सुंदर नातं. मालिकेच्या कथानकाबरोबर कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावलं असून ही मालिका अनेक वर्ष टीआरपीच्या शर्यतीत होती. आता मालिकेने तब्बल २५ वर्षांचा लीप घेतला असून यामध्ये जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माची कहाणी पाहायला मिळत आहे. (Madhavi Nemkar emotional post)

दरम्यान, मालिकेच्या या नव्या पर्वात बऱ्याच जुन्या कलाकारांनी निरोप घेतला असून काही नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत. आता या मालिकेतील अनेक जुन्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत आहे. त्यात शालिनी ही खलनायिकेचं पात्र साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर हिने एक भावुक पोस्ट केली.

हे देखील वाचा – Video : हटके पोझ, अन्…; अरुण कदमांच्या नातवाचा हटके अंदाज, व्हिडीओ व्हायरल, म्हणाले, “बॉक्सर भाई…”

माधवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली. माधवीने मल्हार म्हणजे कपिल होनरावबरोबरचे सेटमधील एकत्र फोटो शेअर केले असून या पोस्टद्वारे दोघांनी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. “आम्हा दोघांचा हा एकत्र प्रवास खूप अविस्मरणीय होता. ३ वर्ष कधी संपली कळलंच नाही. शालिनी व मल्हार म्हणून आमच्या अनेक एकत्र आठवणी आहेत. मजा, मस्ती, गप्पा, खूप आठवणी आहेत. शालिनी-मल्हारचा प्रवास थांबला. पण नक्कीच लवकरच एकत्र काम करू. शालिनी-मल्हार जोडीला खरंच भरभरून प्रेम मिळालं. ही पोस्ट विशेष करुन आमच्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमचे रील्स, फोटोस पोस्ट करून त्यांचं आणि त्यांना फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेम आमच्या पर्यंत पोहोचवलं. त्यामुळे तुम्हा सर्वांचे प्रेम, समर्थन आणि आशिर्वादाबद्दल मनापासून धन्यवाद.”, असं ती या पोस्टमध्ये म्हणाली.

हे देखील वाचा – लेकीसह मोठा पडदा गाजवण्यास किंग खान शाहरुखची तयारी सुरु, चित्रपटाचं नावंही आलं समोर

View this post on Instagram

A post shared by maadhavi nemkar (@maadhavinemkarofficial)

माधवीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांसह अनेक नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एका चाहतीने यावर कमेंट करत म्हणाली की, “तू या मालिकेत नसणार, तर मला खूप वाईट वाटेल. आमची आवडती खलनायिकाच जर यात नसेल तर.”, असं म्हणत तिने शालिनीच्या भूमिकेला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरा चाहत्याने यावर “आम्ही तुम्हाला खूप मिस करणार. मालिकेत तुमची जोडी खूप भारी आहे. तुम्ही आमच्या मनात नेहमी राहणार.”, अशी कमेंट चाहते या जोडीला प्रचंड मिस करत असल्याचं म्हटलं आहे.

Tags: madhavi nemkarMadhavi Nemkar emotional postshalinisukh mhanje nakki kay asta
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
actress sayali sanjeev did nail art for her upcoming marathi movie jhimma 2 promotion

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सायली संजीवची अनोखी शक्कल, नक्की काय केलं पाहा?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.