श्रावण महिन्यानिमित्त अनेक महिलांच्या घरी मंगळागौर साजरी होत आहे. मराठी मालिकांमध्येही सध्या मंगळागौरीची क्रेझ पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक कलाकारही त्यांच्या खऱ्या आयुष्यात मंगळागौर साजरी करताना दिसत असून या सोहळ्याचे अनेक फोटोज व व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना दिसत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांची लग्नानंतरची पहिली मंगळागौर थाटामाटात पार पडली. (Akshaya Deodhar Mangalagaur)
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध जोडी हार्दिक व अक्षया हे काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर अक्षयाची पहिली मंगळागौर नुकतीच पार पडली. त्यांच्या पहिल्या मंगळागौरचे अनेक फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षयाने तिच्या लाडक्या पतीसाठी खास उखाणा घेतला, ज्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.
अक्षयाने मंगळागौरनिमित्त खेळले जाणारे अनेक खेळ खेळले असून हार्दिकनेही तिच्यासह यावेळी ठेका धरला होता. त्यानंतर तिने तिचा पती हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. “पावसाळा संपत आला येईल आता हिवाळा, हार्दिकरावांचं नाव घेते मंगळागौरीचा कार्यक्रमात छान पार पडला, मानसीचा सोहळा” असा छानसा उखाणा अक्षयाने घेताच हार्दिकसह सर्वांनी तिचं टाळ्या वाजवून कौतुक केलं आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – “Happy Birthday Aai …” नम्रता संभेरावला लेकाने दिलं स्वकष्टाने बनवलेलं गिफ्ट, गिफ्ट पाहून म्हणाली, “या दिवसाची…”
अक्षयाने तिच्या पहिल्या मंगळागौरसाठी विशेष तयारी केली होती. अक्षया व हार्दिक हे दोघेही यावेळी पारंपारीक पेहरावात पाहायला मिळाली. शिवाय, तिच्या हातांवर करण्यात आलेली मेहंदी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याचबरोबर दोघांच्या मंगळागौर पूजेचे फोटोजही चाहत्यांच्या अधिक पसंतीस पडला आहे.
हे देखील वाचा – Video : नऊवारी साडी, धोतर सदरा अन्…; बायकोसह हार्दिक जोशीचे मंगळागौरीचे खेळ, नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल
छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ही जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली. दोघांची ही ऑनस्क्रीन लव्हस्टोरी प्रेक्षकांना जितकी भावली होती, तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा भावली होती. मालिका संपल्यानंतर काही दिवसात साखरपुडा व विवाह सोहळा पार पडला होता. लग्नानंतर या जोडीचे अनेक गोड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्याची नेहमीच चर्चा होते. (Akshaya Deodhar Mangalagaur)