बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवसांपासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत देशभरात ३०० कोटींचा आकडा गाठला आहे. तर, विदेशातही ‘जवान’ चांगली कमाई करताना दिसून येत आहे. एकीकडे चित्रपटाला हे यश मिळत असताना नुकतंच निर्मात्यांनी या चित्रपटाचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये शाहरुख वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. (Jawan New Promo)
याआधी ‘जवान’च्या पहिल्या ट्रेलरमध्ये शाहरुखच्या तोंडी “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर…” असा डायलॉग आहे, ज्याची चर्चा सोशल मीडियावर भरपूर झाली होती. या डायलॉगवरून अभिनेत्याने समीर वानखेडेला अप्रत्यक्ष टोला लागवल्याचं नेटकरी म्हणाले आहे. अशातच शाहरुखच्या या नव्या डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. शाहरुखने या चित्रपटाचा नवा प्रोमो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
हे देखील वाचा – सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये समुद्रकिनारी घेतलं कोट्यवधी रुपयांचं घर, किंमत आहे तब्बल…
समोर आलेल्या या प्रोमोमध्ये शाहरुख ॲक्शनपॅक अंदाजात दिसत आहे. “वो अंत है तो मै काल हूं, वो तीर है तो मैं ढाल हूं… हूं पुण्य पाप से परे, चिताकी वो आग हूं, जो ना टले वो श्राप हूं… मैं तुम्हारा बाप हूं!”, असा डायलॉग शाहरुख या प्रोमोमध्ये म्हणताना दिसत आहे. मात्र, त्याचा हा डायलॉग प्रेक्षकांना चित्रपटात ऐकायला मिळणार नाही. या प्रोमोसह पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये अभिनेता म्हणतो, “बेटा तो बेटा, बाप रे बाप!! अब ना रुकना चलने देना”. हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटकऱ्यांसह चाहतेही या व्हिडिओवर भरभरून कमेंट करताना दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेतील भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून अभिनेत्रीच होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात अभिनेत्री नयनतारा व विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत दिसत आहे. या तिघांसोबत सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक व अन्य कलाकार झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटलीने केले आहे.