रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये समुद्रकिनारी घेतलं कोट्यवधी रुपयांचं घर, किंमत आहे तब्बल…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 14, 2023 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sonakshi Sinha bought new apartment

Sonakshi Sinha bought new apartment

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. २०१०मध्ये रिलीज झालेल्या ‘दबंग’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘राउडी राठोड’, ‘जोकर’, ‘लुटेरा’ सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आजवर साकारलेल्या अभिनयातून व स्टाईलिश अंदाजातून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनाक्षी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सध्या ती नव्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीने नुकतच मुंबईत स्वतःचं आलिशान घर घेतलं आहे. तिच्या या नवीन घराची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. (Sonakshi Sinha bought new apartment)

विशेष म्हणजे सोनाक्षीने खरेदी केलेलं हे घर सी फेसिंग आहे. तिने वांद्रे परिसरातील रंग शारदा सभागृहाजवळ ८१ ओरेटमध्ये ४,२०० चौरस फुटांचे हे सीफेसिंग घर आहे. तिच्या या घराची किंमत ११ कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. हे घर इमारतीत २६व्या मजल्यावर असून हा या इमारतीचा सर्वात टॉप फ्लोर आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत या घरासाठी सोनाक्षीनं ५५ लाख रुपये भरले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – “हिंदी चित्रपटांतील नायकांपेक्षा…”, अशोक मामांसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, “ते भेटतात तेव्हा…”

तिच्या या नवीन घराचा लॉबी एरिया ३४८.४३ स्क्वेअर फूट इतका आहे. विशेष म्हणजे हेल्पर टॉयलेट व एअर हँडलिंग युनिटसाठीही या घरात विशेष जागाही आहे. घराचा एकूण कार्पेट एरिया ४,२१०.८७ चौरस फूट आहे. याबरोबरच तिला चार कार पार्किंगची जागाही या घराबरोबर मिळणार आहे. माहीम खाडी व वांद्रे-वरळी सी लिंगचे सुंदर दृश्यही तिच्या या घरातून दिसतं.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – Video : परदेशात असलेला संकर्षण कऱ्हाडे बनवतोय जेवण, फोडणीचा भात बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल

तिने या घराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंट करत तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहे. एका नेटकऱ्याने ‘तुझा खुप अभिमान वाटतो. खूप छान जागा आहे’, असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे.  सोनाक्षी ही ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा काही दिवसांपूर्वी ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच तिने ‘दहाड’ वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. या सिरिजमध्ये तिने साकारेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

Tags: bandra Mumbaibollywood actressnew apartmentsonakshi Sinha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Teen Adkun Sitaram Trailer

'तीन अडकून सीताराम'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित, तीन मित्रांना सोडवण्यासाठी प्राजक्ता माळीची धडपड पाहायला मिळणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.