‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. नातवाने आपल्या आजोबांच्या जीवनपटावर भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला अगदी अचूक आकार दिलाय. पहाडी आवाजाने गीत सादर करणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचा हा चरित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात घुमघुमतोय. लोककलावंताच्या वाटेला येणार आणि समाजसुधारकाच आयुष्य या चित्रपटाच्या कथेतून मांडण्यात आलंय. या चित्रपटात शाहिरांच्या भूमिकेत अंकुश चौधरी तर त्यांची पत्नी भानुमती यांची भूमिका केदार शिंदे यांची लेक सना शिंदे हिने साकारलीय. तर शाहिरांची दुसरी पत्नी मालती कदम अर्थात राधाबाई साबळे यांची भूमिका चित्रपटात अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारलीय.(Kedar Shindes Emotional Post)

काल हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक म्हणून वा शाहीर साबळे यांचा नातू म्हणून केदार शिंदे काय पोस्ट करतील याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच केदार शिंदे यांनी आज एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकवर्ग आज सिनेमाला भरभरून साथ देतोय. अशातच शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंनी म्हणजेच सर्वांच्या माईंनी हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. हा सिनेमा त्यांना कसा वाटला याचं उत्तर केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या फोटोतूनच मिळालंय. केदार शिंदेंनी आजी राधाबाईंचा एक फोटो शेयर केलाय. या फोटोत राधाबाईंनी केदारला मिठी मारलेली दिसतेय. महाराष्ट्र शाहीर राधाबाईंना कसा वाटला याचं उत्तर या एका कृतीमधून मिळालं आहे.
चित्रपट पाहून केदार शिंदेंची भावुक पोस्ट (Kedar Shindes Emotional Post)

केदार शिंदे यांनी या फोटोसोबत पोस्ट शेअर करत लिहिलंय, ‘आणि ही प्रतिक्रिया होती.. मालती कदम अर्थात श्रीमती राधाबाई साबळे यांची. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहिला असेल तर लागलीच लक्षात येईल. पाहिला नसेल तर आजच तिकीट काढून पाहा. तरच या लाख मोलाच्या जादू की झप्पीचे महत्व समजेल.’(Kedar Shindes Emotional Post)
हे देखील वाचा – ‘महाराष्ट्र शाहीर….’ गीत संगीताने बहरला
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पुढच्या पिढीसाठी एक ठेवा ठरावा या उद्देशाने ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ आणि ‘केदार शिंदे प्रोडक्शन’ने या चित्रपटाची निर्मिती केली. आज हा महाराष्ट्राचा महासिनेमा संपूर्ण महारष्ट्रात प्रतेय्क महाराष्ट्रीयांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे.
