आजच्या दिवशी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अस्सल मराठी मातीतील प्रेमकथा असलेला “सैराट” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले होते. या चित्रपटातील गाण्यासोबतच या चित्रपटातील डायलॉग सुद्धा तेवढेच फेमस झाले. हा चित्रपट सामाजिक वास्तव्य दर्शवणारा चित्रपट होता. सैराट या सिनेमाला सात वर्षे पूर्ण झाली असून, या चित्रपटात आर्ची हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने याबद्दलच्या इंस्टाग्रामवर काही आठवणी शेअर केल्या आहेत. (Sairat completes seven years)
रिंकूने या पोस्टमध्ये सैराट या चित्रपटातील अभिनेता आकाश ठोसर सोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. या पोस्टला रिंकूने “7 years of SAIRAT Unforgettable जर्नी…सैराटला सात वर्ष पुर्ण.” असे कॅप्शन दिले आहे. रिंकूच्या या पोस्टवर एकाने “सैराट मुवी बघून पळून गेलेल्यांना पण साथ वर्ष पूर्ण होणार आणि त्यांना मुलबाळ असतील तर ते पुढच्या वर्षी पहिल्या वर्गात जाणार” अशी मिश्किल अंदाजात कमेंट केली आहे. तसेच अनेकांनी Congratulations म्हणत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
हे देखील वाचा: अनघा वाचवू शकेल का अभिचा जीव ?
सैराट चित्रपटाला प्रदर्शित होऊन अनेक वर्षे जरी झाली असली तरी सैराट हा चित्रपट अजून सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चं सैराट च्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटातील “झिंगाट” या गाण्याने तर अनेकांची लग्ने आणि हळदी गाजवल्या. या चित्रपटाच्या संगीताची पूर्ण जबाबदारी अजय-अतुल यांच्यावर होती. अजय – अतुल यांच्या कारकीर्तीतील सैराट या चित्रपटातील संगीत सगळ्यात हिट ठरले. (Sairat completes seven years)
हे देखील वाचा: ‘महाराष्ट्र शाहीर….’ गीत संगीताने बहरला
याचबरोबर सैराट हा सिनेमा समाजात घडणाऱ्या घटनेवर आधारित होता. जेव्हा एक मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात, तेव्हा समाज त्यांना ते एकत्र येऊ नये या साठी विविध प्रयत्न करणाऱ्या समाजाला कसं तोंड देतात, हे दाखवणारा हा सिनेमा आहे. तसेच या चित्रपटामध्ये दोन प्रेमी युगलकांचा शेवट कसा होतो. हे वास्तव दर्शवणारा हा सिनेमा आहे. आज सुद्धा सैराट सिनेमा दूरदर्शन वाहिनीवर लागल्यानंतर चित्रपट प्रेमी हा सिनेमा पहिल्या खेरीच राहत नाहीत.