शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानचा ‘डंकी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक कमाई करणार, एका दिवसातच कमावले तब्बल…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 22, 2023 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
shah rukh khan dunki movie 1st day collection see the details

शाहरुख खानचा 'डंकी' पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी, रेकॉर्डब्रेक कमाई करणार, एका दिवसातच कमावले तब्बल…

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे आणि अशातच काल (२१ डिसेंबर) रोजी हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘डंकी’ हा शाहरुखचा यंदाच्या वर्षातील तिसरा बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे त्याचे लाखो चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते आणि आपल्या चाहत्यांच्या भेटीसाठी शाहरुख ‘डंकी’ चित्रपट घेऊन आला आहे. दरम्यान, ‘डंकी’ हा पहिल्याच दिवशी चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Dunki Movie 1st Day Collection)

राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भरघोस कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या यंदाच्या वर्षातील हा सातवा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शाहरुखच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत ‘डंकी’ने निम्म्यापेक्षा कमी कमाई केली आहे. सोशल मीडियावरदेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

आणखी वाचा – 6TH MAJJA DIGITAL AWARD मध्ये या मालिका व कलाकारांनी पटकावला पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मालिका ठरली…; वाचा संपूर्ण यादी

प्रभासच्या ‘सालार’ नंतर शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तरीही ‘डंकी’ने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेल आहे. विशेषत: महाराष्ट्र, दिल्ली व पश्चिम बंगालसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ‘डंकी’ने पहिल्याच दिवशी अनुक्रमे १.८१ कोटी, १.५५ कोटी व १.२२ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, ‘डंकी’ व ‘सालार’ या दोन प्रतिस्पर्धी चित्रपटांमध्ये सध्यातरी ‘डंकी’ने बाजी मारली आहे.

आणखी वाचा – मलायका अरोरासह घटस्फोट, गर्लफ्रेंडलाही सोडलं, आता भलत्याच मुलीबरोबर अरबाज खान करणार लग्न, तयारी सुरु

चित्रपटाची मनोरंजक कथा, कलाकारांची उत्कृष्ट कामगिरी, राजकुमार हिरानी यांचे उत्तम दिग्दर्शन तसेच शाहरुखची क्रेझ आदि कारणे चाहत्यांना ‘डंकी’ पाहायला प्रोत्साहित करत आहे. त्याचबरोबर प्रभासच्या ‘सालार’कडून स्पर्धेला सामोरे जावे लागल्यानंतरही, ‘डंकी’ने दर्शकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट आणखी किती कमाई करणार? बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवण्यात त्याला यश मिळेल की नाही? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.

Tags: bollywood actorbollywood newsdunkientertainmententertainment newsshah rukh khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Ajay Devgn On Father

१३व्या वर्षी घर सोडलं, मुंबईत येऊन बनले गुंड अन्…; अजय देवगणने सांगितली वडिलांच्या संघर्षाची कहाणी, म्हणाला, "रस्त्यावर भांडताना त्यांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.