‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख ही जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली होती. या दोघांच्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. या दोघांच नातं प्रेक्षकांना सर्वाधिक आवडलं. ‘बिग बॉस’नंतरही त्यांच्यातील मैत्रीचं हे नातं कायम राहिलं. काही काळानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. महिन्यांभरापूर्वी त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आता दोघांची लगीनघाई सुरु झाली आहे. सध्या या दोघांच्या केळवणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Amruta ukhana video viral)
नुकतंच यादोघांच्या पहिल्या केळवणाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या व्हिडीओत दोघांनीही घेतलेल्या उखाण्याने सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच यावेळी त्यांनी केलेला पारंपरिक लूक चाहत्यांना बराच पसंतीस पडला. विशेष म्हणजे या दोघांच्या केळवाणाचं आयोजना अमृताच्या आजोबांनी केलं होतं.
आता या दोघांच्या दुसऱ्या केळवाणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होता आहे. नुकतच मोठ् थाटामाटात या दोघांचं दुकरं दुसरं केळवण पार पडलं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांनी या विशेष केळवाणाचं आयोजन केलं होतं. मालिकेतील सगळ्या कलाकार मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला दिग्दर्शक संजय जाधवही उपस्थित होते. या केळवणाची व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. त्यात अमृताने घेतलेला उखाणा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
उखाण्याचा हा व्हिडिओ शेअर करत तिने म्हटलं, “उखाणा नो. २! What a fun केळवण… thank you”, असं म्हणत तिने व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. यावर नेटकऱ्यांनीही कमेंट करत दोघांच्या जोडीचं बरंच कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘उखाणा घेण्यात तुझा हात कोणीच धरु शकत नाही’, अशी कमेंट करत तिच्या उखाण्याचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘कमाल आहेस तू’, असं म्हणत व्हिडिओवर कमेंट केली आहे.