सध्याच्या जमण्यात मनोरंजनासाठी अनेक चित्रपट, मालिकांचं मोठं विश्व प्रेक्षकांसाठी खुलं आहे. पण नाटक हे माध्यम असं आहे जिथे प्रेक्षक अजूनही खिळून राहतो. रंगभूंमीवर अनेक नाटक आतापर्यंत आली आणि अक्षरशः त्यांनी रंगभूमी गाजवली. काही नाटकांनी जरा विश्रांती घेऊन त्याच उत्साहात पुन्हा सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. नाटकांच्या या विश्वात आणखी एक नवंकोरं नाटक रंगभूमीवर अवतरत करत आहे.(Mohan Joshi Savita Malpekar)
मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक २२ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले असून पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केले आहे.

सुमी आणि आम्ही फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर या दोघांसोबत श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.(Mohan Joshi Savita Malpekar)
हे देखील वाचा- ‘सध्या भाऊ माझ्या पालकांच्या जागेवर’ओंकारने शेअर केला भाऊ कदम यांच्यासोबतचा अनुभव
वाचा भूमिकेविषयी काय म्हणाले मोहन जोशी(Mohan Joshi Savita Malpekar)
आपल्या भूमिकेविषयी सांगताना मोहन जोशी सांगतात की आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा मी साकारतोय. सविता आणि पुरुषोत्त्तम यांच्यासोबत काम करायला मिळतंय, विशेष म्हणजे राजन मोहाडीकर या माझ्या मित्राने हे नाटक लिहिल्याने एक उत्तम सकस नाटयकृती असणार हे लक्षात घेऊन मी हे नाटक करायला होकार दिला. जवजवळ १२ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर काम करणाऱ्या सविता मालपेकर सांगतात, माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळया बाजाची भूमिका आणि त्यात पुन्हा पुरुषोत्तम बेर्डे आणि मोहन जोशी या माझ्या आवडत्या मंडळीसोबत काम करण्याची संधी मला मिळाली ती संधी सोडणं मी शक्य नव्हतं. मेधा धडफळे ही माझी व्यक्तीरेखा आहे.
अभिनयातील परिपक्वता, सहजता यांचा सुरेख मिलाफ या दोघांच्या अभिनयातून पाहायला मिळतो. रंगभूमीवर बऱ्याच वर्षांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना एका चांगल्या टीमसोबाबत काम केल्याचं समाधान देणारं हे नाटक प्रेक्षकांना ही अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघे व्यक्त करतात.