रंगमंचाचा सदाबहार इतिहास मराठी नाट्य सृष्टीला लाभला आहे. अनेक महान कलावंतांच्या अपार मेहनतीने सजलेला रंगमंच आज नव्याने भरताना दिसतोय. अनेक नवीन आणि समाजातील विषयांवर परखड भाष्य करणारी नाटकं कलाकार सादर करत आहेत.अशातच
आणखी एका नाटकाची भर पडली आहे. कॉमेडीच्या राज्यातील दोन राजकुमार म्हणून ओळख असणारे अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेता ओंकार भोजने यांच्या प्रमुख भूमिकांनी सज्ज असलेलं ‘ करून गेलो गाव ‘ हे नाटकं पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज झालं आहे.(Onkar Bhojane Bhau Kadam)

१० वर्षांपूर्वी या नाटकाने रंगमंचावर धुमाकूळ घातलेला त्या नाटकात भाऊ कदम आणि सागर कारंडे हे मुख्य भूमिकेत होते कालांतराने झालेल्या बदलत आता ओंकारची नव्याने या नाटकात एन्ट्री झाली आणि ओंकार भोजनेच्या विनोदाचं टायमिंग आख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यामुळे नाटकं गाजणार यात शंकाच नाही.
हे देखील वाचा – म्हणून दादांनी लिहिलं ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…..’
नाटकाच्या रंगीत तालमी दरम्यान ओंकार भोजने ने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांच्या सोबत काम करतानाच अनुभव कसा आहे विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भाऊ कदम यांच्या बद्दल असणारा आदर भाव व्यक्त केला आहे. उत्तर देताना ओंकार म्हणाला ‘ काम करताना काहीजण आपले मित्र बनतात तर काहीजण आपले पालक बनतात जे आपल्याकडून योग्य ते काम करवून घेतात. (Onkar Bhojane Bhau Kadam)

आणि भाऊ सेट वर असले की…
भाऊ हे माझ्यासाठी त्या पालकांच्या जागेवर आहेत असं म्हणत ते मला सांभाळून घेतात. पुढे भाऊंबद्दल बोलताना ते ओंकार म्हणाला तालमीला फक्त मीच नाही तर सर्वानाच भाऊ सांभाळून घेतात. तर भाऊ कदम यांनी सुद्धा ओंकार च कौतुक केलं आहे. आणि ओंकार सोबत काम करताना मला देखील मज्जा येते असं भाऊ म्हणाले.
हे देखील वाचा – आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’
मालवणी भाषेतील या नाटकात सध्याच्या राजकीय परिस्थती वर सुद्धा परखड भाष्य करण्यात आले तर या नाटकाची निर्मिती राहुल भंडारी आणि मराठीतील प्रसिद्ध दिगदर्शक महेश मांजरेकर यांनी केली आहे. तर नाटकाच्या दिगदर्शनाच्या धुरा राजेश देशपांडे यांनी सांभाळली आहे. ७ एप्रिल पासून हे नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर दादर येथे पार पडणार आहे.