सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सजदेह यांनी १९९८ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला आता २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटावरून बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा सजदेह हिने भाष्य केलं आहे. सोहेल खानला घटस्फोट का द्यावा लागला? याबाबत सीमा बोलताना म्हणाली की, तिने घटस्फोटचा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. (Sohail Khan Seema Sajdeh divorce Reason)
सीमाने अलीकडेच शिवानी पौडच्या एका पॉडकास्टमध्ये तिच्या घटस्फोटाबद्दल चर्चा केली. घटस्फोटासाठी सीमाने सोहेल खानला जबाबदार धरलेलं नाही. ती म्हणाली की, “मी त्याला का दोष देऊ, हा निर्णय आमच्या दोघांचा होता. आमचा मुलगा निर्वाण अशा वयात आला जेव्हा त्याला हे नको होते पण एक वेळ आली जेव्हा मला माझे लग्न आणि माझा मुलगा यापैकी एक निवडावं लागलं. वाईट वातावरणाने आपल्या मुलांचे आपण किती आणि कधी नुकसान केलं आहे ते आपल्याला कळतही नाही. पालकांमधील भांडणात मुलांना त्रास होतो. त्यामुळेच मी जाणीवपूर्वक सोहेलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मी आणि सोहेल अनेक वर्षांपासून वेगळं राहत होतो.”
याशिवाय सीमा म्हणाली, “काही लोक याबद्दल वेगवेगळी मतं मांडतात. मी इतर महिलांना पाहून हा निर्णय घेतला असंही कित्येकजण बोलले आहेत. पण हा माझा सर्वस्वी स्वतःचा निर्णय आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र आनंदी नसतात, जेव्हा त्यांच्यात सततची भांडण होत असतात, तेव्हा याचा परिणाम नेहमीच मुलांवर होतो.”
शेवटी घटस्फोटावर सीमा म्हणाली, “खरं सांगायचं तर घटस्फोट हे कागदोपत्री काम आहे. आम्ही बरीच वर्षे वेगळे राहत होतो आणि आमच्यात सर्व काही ठिक होते. नीरव शाळेत जात होता, तो माझ्याशी खूप बोलला, मग तो विद्यापीठात गेला आणि म्हणाला, ‘मम्मा मी आता ठीक आहे, तू पुढे जाऊ शकतेस.’ तेव्हाच मी ठरवले की ठीक आहे, आता माझी वेळ आली आहे. मी घटस्फोट घेऊ शकते. घटस्फोट फक्त एक कागदी तरतूद होती.”