शिवची गौरी म्हणून काहे दिया परदेस मालिकेतून सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान बनवले. मराठी सोबतच सायली हिंदी मालिकेत देखील पहायला मिळाली.छोट्या पडद्याप्रमाणे तिने चित्रपट ही केले. झिम्मा, मन फकिरा, सातारचा सलमान अशा अनेक चित्रपटात ती पहायला मिळाली. (Sayali Sanjeev)
गोष्ट एका पैठिणीची या चित्रपटातील सायलीच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवॉर्ड चा पुरस्कार देखील मिळाला. चित्रपट, मालिका, वेब सिरीज या सर्व माध्यमात सायलीने तिच्या कामाचा ठसा उमटवला आहे. एका साचत न राहता,सायली नवनवीन भूमिका साकारत असते. सोज्वळ गौरी प्रमाणे डॅशिंग अशी कृतिका ही सायलीने तितक्याच उत्तम प्रकारे हाताळली.
पहा सायलीच्या नवीन फोटोशूटची झलक (Sayali Sanjeev)
अशी प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री तिच्या सालस अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकून घेते. त्या सोबत सायली अनेक फोटोशूट्स देखील करत असते. आणि तिच्या सोशल मीडियावरून हे फोटोज ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिच्या या लूक्सना प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवत असतात. नुकतंच सायलीने गुलाबी रंगाच्या साडीवरती एक फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोजची झलक तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. या शूट मधील तिच्या हेअर स्टाईलने तिला एक वेगळा लुक दिला आहे. या लुक मध्ये देखील ती खूप सुंदर दिसत आहे.प्रेक्षकांन सोबत कलाकारांनी सुद्धा कमेंट करून सायलीच्या या लुक चे कौतुक केले आहे. (Sayali Sanjeev)
ग्लॅमर्स, बोल्ड या पेक्षा सायली ट्रॅडिशनल गोष्टींना जास्त पसंती देताना दिसते. वेगवेगळ्या साड्यांवरती. ती अनेक लूक्स ट्राय करत असते. कमीत कमीत जितकं साध्य पद्धतीने तयार होता येईल याकडे तिचा कल पहायला मिळतो. कमी दागिने, जास्तीत जास्त नॅचरल वाट्टेल असा मेकअप यावर सायली भर देते. तिच्या या लूक्स मुळे देखील तिचे फोटोज अगदी सालस दिसतात. एक शांतता तिच्या चेहऱ्यावर पहायला मिळते. तिच्या या मनमोहक अदा कायमच प्रेक्षकांना भुरळ घालतात.

हे देखील वाचा : काल match जिंकलो म्हणून yellow dress ? सायलीच्या फोटोवर ऋतुराजच्या फॅन्सचा धुमाकूळ