शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ विषयामध्ये मास्टर्स करतेय सायली संजीव, परीक्षाही झाली सुरु, अभ्यास करतानाचा फोटो केला शेअर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2023 | 3:06 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sayali Sanjeev New Journey

Sayali Sanjeev New Journey

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. शिवची गौरी म्हणून सायलीला या मालिकेमुळेच खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेपासून सायलीने तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु केला. एखादया विषयाचं ज्ञान घेण्यासाठी झटणारी सायली नेहमीच साऱ्यांच्या पसंतीस पडते. छोटा पडदा गाजवल्यानंतर सायलीने तिची पावलं सिनेइंडस्ट्रीकडे वळविली. ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’ या चित्रपटांमध्ये सायलीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. आता सायली एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. सायलीने सिनेमाविश्वातून ब्रेक घेत आता अभ्यासाचा ध्यास घेतला आहे. (Sayali Sanjeev New Journey)

सायलीने सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. यांत ती अभ्यास करताना पाहायला मिळत आहे. ‘शिकायचं थांबवू नका’, असं म्हणत सायलीने अभ्यासाचे धडे घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सायलीचा अभ्यासाविषयीचा ध्यास पाहायला मिळतोय. सायली राज्यशात्राचा अभ्यास करत आहे. ती पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स करत आहेत. सिनेसृष्टीतून ब्रेक घेत तिने शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं आहे.

पाहा सायली अभिनया व्यतिरिक्त कशाचा अभ्यास करतेय

याबाबत एकदा तिने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीतही भाष्य केलं होत. सायलीला यंदाच्या वर्षात तुझी कोणती बातमी रंगणार असा प्रश्न विचारला होता, यावर उत्तर देत सायली असं म्हणाली होती की, ‘मी राज्यशास्त्राचा अभ्यास करतेय, मी मास्टर करतेय एम ए इन पॉलिटिकल सायन्स मध्ये तर याची चर्चा यंदाच्या वर्षात रंगू शकते. सायली अभिनयासोबतच शिक्षणही घेतेय ही वाखाणण्याजोगी बाब आहे.

हे देखील वाचा – अखेर प्रतीक्षा संपली ‘हा’ नवा चेहरा दिसणार ‘अंकुश’च्या भूमिकेत, केतकी माटेगावकरसह कोणता अभिनेता दिसणार?

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

हे देखील वाचा – “कितीला विकत घेतलं?” इन्स्टाग्रामला ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर विशाखा सुभेदार ट्रोल, अभिनेत्री म्हणते, “गीतेवर हात ठेवून…”

सायलीचा या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सायलीने आजवर अनेक चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातील तिची भूमिका अधिक लक्षवेधी होती. सायलीने ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात सायलीने इंद्रायणी हे पात्र साकारले होते. आशयघन कथा असलेल्या या चित्रपटातील भूमिकेसाठी सायलीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा अवार्ड देखील मिळाला.

Tags: entertainmentsayali sanjeev
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Social

बेडरुममध्ये कॅमेरा, पत्नीबरोबर लाईट सुरु ठेवत शारीरिक संबंध अन्…; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे काळे धंदे, संपूर्ण प्रकार उघड

मे 23, 2025 | 5:25 pm
Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Next Post
Tu Chal Pudha Actress

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘तू चाल पुढं’ मालिकेला रामराम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी यापुढे…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.