मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला राजकारणात सहभागी व्हायचंय”, मराठी अभिनेत्री सायली संजीवने सांगितली तिची इच्छा, म्हणाली, “माझं ध्येय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2025 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sayali Sanjeev On Politics

"मला राजकारणात सहभागी व्हायचंय", मराठी अभिनेत्री सायली संजीवने सांगितली तिची इच्छा, म्हणाली, "माझं ध्येय…"

Sayali Sanjeev On Politics : अनेक अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर कलाविश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने लवकरच राजकारणात येणार असल्याचं भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून सायली संजीव घराघरांत पोहोचली. आजवर सायलीने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मन जिंकली आहेत. काही वर्षांपूर्वी सायलीने पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेतले होते, तेव्हापासून अभिनेत्रीला राजकीय आवड असल्याचं समोर आलं. आता या शिक्षणाचा ती खऱ्या आयुष्यात अवलंब करणार असल्याचं समोर आलं आहे.

सायली संजीवने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीदरम्यान सायलीला ती राजकारणात एन्ट्री करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायली म्हणाली, “मला सक्रीय राजकारणात सहभागी होऊन काम करायचं आहे. मी जेव्हा राजकारणात येईन तेव्हा काही गोष्टी कदाचित बदललेल्या असतील. त्यामुळे मला आज ज्या समस्या आहेत त्याकडे बघून मी माझं तेव्हाचं ध्येय ठरवलं, तर त्याचा आता काय फायदा होणार नाही. तेव्हा त्याचा तसा संबंध नसेल. मला लहानपणापासून वाटतं की, इथे घाण आहे, हा रस्ता खराब आहे, इथे पाणी नाही किंवा वीज नाही. काही ठिकाणी खड्डे तर आहेतच, पण साधा रस्तासुद्धा नाही. तर याबद्दल आपण सतत तक्रारी करण्यापेक्षा मला असं वाटतं की, आपण ते करुन बघू आणि जर ते आपल्याला जमलं तरच आपल्याला दुसऱ्यांना नावं ठेवण्याचा हक्क आहे”.

आणखी वाचा – विवेक लागू यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली लेक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “बराच काळ एकत्र लढलो…”

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

पुढे ती म्हणाली, “जर आपल्याला जमलं नाही तर ते काम खूप अवघड आहे. मला वाटतं की, आपण प्रयत्न करुन बघायला हवा. छान रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, स्वच्छता हवी, प्लॅस्टिक नको हे सगळं करण्यासाठी काय मेहनत लागते हे आपणही पाहायला हवं. म्हणजे फक्त व्यवस्थेला आणि शासनाला नावं ठेवण्यापेक्षा त्यात उतरुन काय काय करावं लागतं हे पाहण्याची गरज आहे. आपण जोपर्यंत ते काम करुन बघत नाही. तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत”.

आणखी वाचा – संजय कपूर अनंतात विलीन, पतीला शेवटचं पाहताना करिष्मा कपूरच्या डोळ्यांत पाणी, दोन्ही मुलंही ढसाढसा रडू लागली अन्…

पुढे सायली तिचं मत व्यक्त करत म्हणाली, “जर मी कचरा केला आणि तो कचरा खिशात ठेवून पुन्हा घरी येऊन कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी काय मेहनत आणि शिस्त असावी लागते हे मला माहीत आहे. हीच शिस्त सगळ्यांमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार आधी करावा. नवीन मुलांनी राजकारणाचा करिअर म्हणून विचार केला तर हे खूप उत्तम करिअर आहे. आपल्या पिढीतल्या सगळ्यांना आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश चांगला दिसायला हवा असेल, तर आपल्यासारख्या तरुण पिढीला यात उतरण्याची गरज आहे. हा अभ्यास फार सुंदर आहे”.

Tags: marathi actresspoliticssayali sanjeev
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Neena gupta talk about romance

“म्हातारपणातही रोमान्सची इच्छा होते आणि...”, नीना गुप्तांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “८० वर्षाच्या स्त्रिलाही...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.