मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विवेक लागू यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली लेक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “बराच काळ एकत्र लढलो…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2025 | 11:13 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vivek Lagoo Passes Away

विवेक लागू यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली लेक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, "बराच काळ एकत्र लढलो…"

Vivek Lagoo Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे दि. १९ जून २०२५ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. अद्याप त्यांच्या निधनाचे कारण समोर आलेलं नाही. आज २० जून रोजी मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विवेक यांच्या अचानक जाण्याच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. विवेक लागू हे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पती होते. विवेक यांनी आजवर मराठी, हिंदी सिनेसृष्टीत शिस्तप्रिय नट म्हणून ओळख मिळवली. मराठी रंगभूमीवरुन त्यांची त्यांचा प्रवास सुरु केला. आज विवेक लागू आपल्यात नाहीत यामुळे अनेक कलाकार मंडळी आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

विवेक लागू आणि रीमा लागू यांची मुलगी मृण्मयी लागू ही देखील सिनेविश्वात सक्रिय आहे. मृण्मयी सिनेसृष्टीत अभिनेत्री, सहाय्यक दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिका पेलवताना दिसते. हिंदी सिनेविश्वात ती अधिक सक्रिय आहे. आता वडिलांच्या जाण्याने मृण्मयीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विवेक यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहीत मनं मोकळं केलं आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Lagoo (@mrunmayeelagoo)

मृण्मयीने इंस्टाग्राम अकाउंटवर बाबांबरोबरचा फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आम्ही बराच काळ एकत्र लढलो, पण आता फक्त प्रेम आणि कृतज्ञतेने तुमचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझे बाबा! माझा सर्वात चांगला मित्र, माझा मार्गदर्शक, माझा एक नंबरचा चाहता आणि माझ्या मनातला आवाज… मला तुमची आठवण येईल… तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात”, असं म्हणत तिने वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – कॅलिफोर्निया विद्यापिठातून अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर, फोटो शेअर करत केलं कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव

१९७८ साली रीमा लागू आणि विवेक लागू यांनी लग्न केलं. त्यांना मृण्मयी ही एक मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर काही वर्षात त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यांनी डिवोर्स घेतला. पण मुलीसाठी ते नेहमीच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पण दोघांनीही कधीच अधिकृतरित्या त्यांच्या डिवोर्सचं कारण समोर येऊ दिलं नाही.

Tags: deathmarathi actorVivek Lagoo Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Karisma Kapoor Emotional

संजय कपूर अनंतात विलीन, पतीला शेवटचं पाहताना करिष्मा कपूरच्या डोळ्यांत पाणी, दोन्ही मुलंही ढसाढसा रडू लागली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.