वयाची साठी ओलांडूनही तितक्याच सुंदर आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. अजूनही नीना तितक्याच उत्साहाने काम करतात. त्यांचा लूक आणि फिटनेस तर तरुणांनाही लाजवणारा आहे. मध्यंतरी तर त्यांच्या बर्थडे लूकची तुफान चर्चा रंगली होती. अगदी शेवटपर्यंत आयुष्य अगदी आनंदाने जगावं हा एकमेव संदेश नीना देतात. आताही त्यांनी अशाच एका विषयावर खुलेपणाने भाष्य केलं आहे. एखादं विशिष्ट वय ओलांडल्यानंतर महिलांच्याही काही इच्छा असतात याबाबत त्यांनी आपलं मत मांडलं. म्हातारपणातही इंटिमेट होण्याची इच्छा होणं याबाबत नीना यांनी सांगितलं. (Neena gupta talk about romance)
‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये नीना व्यग्र आहेत. याचदरम्यान त्यांनी बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कधीही न बोलल्या जाणाऱ्या मुद्द्यावर भाष्य केलं. वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये रोमान्स करण्याची इच्छा होते असं नीना यांचं मत आहे. नीना म्हणाल्या, “वयाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रिया त्यांची ओळखच गमावून बसतात. कारण आई, गृहिणी म्हणून ती वावरत असते. पण आपल्या इच्छा आणि ओळख ती मागेच सोडते याचं दुःख वाटतं”.
नीना पुढे म्हणाल्या, “६०, ७० किंवा ८० वर्षाच्या स्त्री किंवा पुरुषाला रोमान्स करण्याची इच्छाच होत नाही असा अजिबात विचार करु नका. स्त्रिया खासकरुन भारतातील स्त्रीया ४०शीमध्येच आता बस्स झालं म्हणतात. आता कित्येक वयाने असणाऱ्या स्त्रिया जीममध्ये जातात, फिट राहतात. इच्छा असलीच पाहिजे. त्यामुळेच आयुष्यामध्ये एक वेगळी चमक असते”.
आणखी वाचा – “मला राजकारणात सहभागी व्हायचंय”, मराठी अभिनेत्री सायली संजीवने सांगितली तिची इच्छा, म्हणाली, “माझं ध्येय…”
“जोपर्यंत श्वास सुरु आहे तोपर्यंत स्वप्न कोण नाही बघत?. सगळेच स्वप्न बघतात. कोणती स्त्री किंवा पुरुष स्वप्नच बघत नाही ते सांगा?. पुरुष आताही बाहेर जातात आणि काहीतरी करुन येतात. पण वयाने असणाऱ्या स्त्रिया स्वप्नच बघणं सोडतात. पण त्यांची कधीच इच्छा नसेल असं तुम्हाला तरी वाटतं का?”. नीना यांनी स्त्रियांच्या मनातील इच्छा सगळ्यांसमोर मांडल्या. बऱ्याचदा हा विषय उघडपणे बोलला जात नाही. मात्र त्यांनी याबाबत स्पष्ट बोलणं स्वीकारलं आहे.





