सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

संजय कपूर अनंतात विलीन, पतीला शेवटचं पाहताना करिष्मा कपूरच्या डोळ्यांत पाणी, दोन्ही मुलंही ढसाढसा रडू लागली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 20, 2025 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Karisma Kapoor Emotional

संजय कपूर अनंतात विलीन, पतीला शेवटचं पाहताना करिष्मा कपूरच्या डोळ्यांत पाणी, दोन्ही मुलंही ढसाढसा रडू लागली अन्…

Karisma Kapoor Emotional : करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि व्यावसायिक संजय कपूर हे १९ जून रोजी अनंतात विलीन झाले आहेत. त्यांचे शेवटचे संस्कार दिल्लीच्या लोधी रोडवरील दयानंद मुकतीधम येथे केले गेले. संजय कपूर यांना अंतिम निरोप देण्यासाठी करिश्मा तिच्या दोन्ही मुलांसह म्हणजेच कियान आणि मुलगी समायरा सह आली होती. वडिलांच्या अंत्यसंकराला करिश्माची मुले भावनिक झाली आणि रडू लागली. अंतिम संस्कारावेळेच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये करिश्मा आणि करीना दोन्ही मुलांना धीर देताना दिसत आहेत.

पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनावेळी करिश्मा कपूरही रडत होती. सोशल मीडियावर उघडकीस आलेल्या फोटोंमध्ये तिच्या डोळ्यांत अश्रू स्पष्टपणे दिसत होते. करीना कपूर आणि सैफ अली खानही संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारास पोहोचले. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवही यावेळी हजर होती. १९ जून रोजी संजय कपूरच्या अंत्यसंस्कारासाठी करिश्मा कपूर दोन्ही मुलांसह दिल्लीला रवाना झाली. तिला कलिना विमानतळावर स्पॉट केले गेले. यावेळी तिच्या आणि मुलांच्या चेहऱ्यावर दु: ख स्पष्टपणे दिसून आले.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जरी संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोट झाला असला तरी ते दोन्ही मुलांच्या अगदी जवळ होते. घटस्फोटाच्या वेळी, त्याने मुलगा किआन आणि मुलगी समायरा यांच्यासाठी १४ कोटी रुपये बॉन्ड विकत घेतले, ज्याचे दरमहा १० रुपये व्याज मिळते. १२ जून रोजी इंग्लंडमध्ये संजय कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूबाबत सुहल सेठने एक्सवर माहिती दिली. तोंडात मधमाशी गेल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आता २२ जून रोजी, दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेल येथे संध्याकाळी ४ ते ५ वाजता संजय कपूर यांच्यासाठी प्रेयर मीट आयोजित केली जाईल.

आणखी वाचा – विवेक लागू यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडून गेली लेक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “बराच काळ एकत्र लढलो…”

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले आणि २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नापासून त्यांना मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुले झाली. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने प्रिया सचदेवशी लग्न केले.

Tags: bollywood newsKarisma Kapoor Emotionalsunjay kapoor last rites
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Sayali Sanjeev On Politics

"मला राजकारणात सहभागी व्हायचंय", मराठी अभिनेत्री सायली संजीवने सांगितली तिची इच्छा, म्हणाली, "माझं ध्येय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.